आयटीसीच्या सहकार्याने पोंभूर्णा येथे अगरबत्ती क्लस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:29 IST2018-03-23T23:29:28+5:302018-03-23T23:29:28+5:30
आयटीसीच्या सहकार्याने पोंभुर्णा येथे अगरबत्ती क्लस्टर विकसित करण्यात येत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

आयटीसीच्या सहकार्याने पोंभूर्णा येथे अगरबत्ती क्लस्टर
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : आयटीसीच्या सहकार्याने पोंभुर्णा येथे अगरबत्ती क्लस्टर विकसित करण्यात येत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
गरीब आणि विधवा महिलांना याचा लाभ होणार असून यासाठी एक क्युआर कोड विकसित करण्यात येणार आहे. या कोडच्या माध्यमातून अगरबत्ती विकत घेणाऱ्या व्यक्तींना या महिलांचा धन्यवाद संदेश ऐकायला मिळेल, अशी व्यवस्था यामध्ये करण्यात आली आहे. आयटीसीच्या ‘मंगलदीप’ या ब्रॅण्डव्यतिरिक्त हा नवीन ब्रॅण्ड विकसित करण्यात येत आहे. ही अगरबत्ती खरेदी करून समाजाप्रती आपले ऋण व्यक्त करण्याची ही एक उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
या उत्पादनाच्या माध्यमातून १ हजार महिलांना रोजगार मिळणार आहे. एक किलो बांबूमधून १०० ग्रॅम अगरबत्ती काड्या तयार करण्यात येणार असून उर्वरित ९० टक्के बांबूमधून इतर उत्पादने तयार केली जाणार आहेत. प्रकल्प उभारणी ते अगरबत्ती विक्रीपर्यंतचे संपूर्ण काम सहा महिन्यात करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आयटीसी त्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक मानांकनासह प्रस्ताव सादर करणार असल्याची माहितीही वनमंत्र्यांनी यावेळी दिली. हा प्रकल्प लवकरच उभा राहणार आहे.