पुन्हा अवकाळी पावसाचा फटका
By Admin | Updated: April 7, 2015 23:58 IST2015-04-07T23:58:52+5:302015-04-07T23:58:52+5:30
चंद्रपूर जिल्ह्याला मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला. ..

पुन्हा अवकाळी पावसाचा फटका
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला. मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कोरपना, ब्रह्मपुरी, गडचांदूर, चंद्रपूर, भद्रावती आदी तालुक्यात मेघ गर्जनेसह पाऊस झाला. ब्रह्मपुरी तालुक्यात काही ठिकाणी गारपीटही झाली.
या पावसामुळे काही ठिकाणी रबी पिकांचे नुकसान झाले असून वादळी पावसामुळे काही शहरातील विद्युत पुरवठा बंद पडला होता. मेघजर्गनेसह आलेल्या पावसामुळे सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी नलेश्वर येथील राईस मिलवर वीज कोसळली. मात्र यावेळी घरी कुणीच नसल्याचे कोणतीही जीवीत हाणी झाली नाही, घर मात्र जळाले. वीज कोसळल्याने घरातील सिलींडरचा स्पोट झाला. चंद्रपुरातही पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही वेळ विजेचा लंपडाव सुरू होता. जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याची ही चौथी ते पाचवी वेळ असून यावपूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या रबी पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)