भांगडिया यांच्याकडून पुन्हा १० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:12 IST2021-05-04T04:12:07+5:302021-05-04T04:12:07+5:30

नागभीड : नागभीड येथे वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन आमदार बंटी भांगडिया यांनी नागभीड कोविड सेंटरला आणखी १० ...

Again 10 jumbo oxygen cylinders from Bhangadia | भांगडिया यांच्याकडून पुन्हा १० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर्स

भांगडिया यांच्याकडून पुन्हा १० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर्स

नागभीड : नागभीड येथे वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन आमदार बंटी भांगडिया यांनी नागभीड कोविड सेंटरला आणखी १० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा केला.

भांगडिया यांनी या अगोदरही या कोविड सेंटरला १० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर्स दिले होते.

नागभीड तालुक्यात कोविड रुग्णांकरिता ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही या हेतूने हे जम्बो सिलिंडर्स उपलब्ध करून दिले आहेत. येथील कोविड सेंटरला हे सिलिंडर्स देतेवेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष रडके, तहसीलदार मनोहर चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी विनोद मडावी, न.प.चे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, कृऊबासचे सभापती आवेश पठाण, न.प.चे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, आनंद भरडकर उपस्थित होते.

Web Title: Again 10 jumbo oxygen cylinders from Bhangadia