तणनाशकाच्या फवारणीनंतर दुसऱ्या शेतातील पिके करपली

By Admin | Updated: November 4, 2016 01:23 IST2016-11-04T01:23:08+5:302016-11-04T01:23:08+5:30

मजुराची टंचाई, मजुरीत वाढ आदीमुळे पिकातील निंदण करणे दुरापास्त झाले आहे.

After the spraying of weedicide, crops are harvested in another field | तणनाशकाच्या फवारणीनंतर दुसऱ्या शेतातील पिके करपली

तणनाशकाच्या फवारणीनंतर दुसऱ्या शेतातील पिके करपली

वरोरा : मजुराची टंचाई, मजुरीत वाढ आदीमुळे पिकातील निंदण करणे दुरापास्त झाले आहे. त्यावर शेतकरी तणनाशकाची फवारणी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. तणनाशकाची एका शेतात फवारणी केली असता बाजूच्या शेतातील पिके करपण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले असल्याने शेतकरी हतबल झाले असल्याचे दिसून येत आहे.
वाढत्या मजुरीने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. निघणारे उत्पन्न व त्यावर मशागती झालेला खर्च पाहता शेती करणे दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. पिकांना सर्वाधिक फटका तणाला बसत असते. त्यामुळे पिकातील तण नष्ट करणे, हा मुख्य उद्देश शेतकऱ्याचा असतो. पिकातील तण नष्ट करण्याकरिता शासनाने मान्यताप्राप्त अनेक कंपन्यांना तणनाशक औषधी निर्माण करणासाठी परवानग्या दिल्या असल्याने बाजारात विविध कंपन्यांची तणनाशक औषधी सहज उपलब्ध होत आहे. तणनाशक औषधी फवारण्याचा त्याचा पिकावर परिणाम होत नाही. तसेच तत्काळ तण नाहीसे होत असते. या पद्धतीमुळे खर्चही कमी येत असल्याचे शेतकरी तणनाशक फवारणीला अधिक प्राधान्य देत आहेत. वरोरा तालुक्यातील तळेगाव येथे एक शेतकऱ्याने तणनाशकाची फवारणी केली. त्यामुळे दुसऱ्या शेतातील भाजीपाला व कपातीचे पिके करपून गेले. त्यांनी करपलेले पीक वरोऱ्यातील कृषी अधिकाऱ्यांना दाखविले. असाच प्रकार अनेक शेतात झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्याची माहिती सुज्ञांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: After the spraying of weedicide, crops are harvested in another field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.