चार दिवसांनंतरही आरोपी मोकळेच

By Admin | Updated: November 15, 2016 00:44 IST2016-11-15T00:44:23+5:302016-11-15T00:44:23+5:30

वेकोलिची महिला कर्मचारी बातुनी अमीर अली शेख यांचा खून होवून चार दिवस उलटले ...

After four days, the accused will be free | चार दिवसांनंतरही आरोपी मोकळेच

चार दिवसांनंतरही आरोपी मोकळेच

महिला कर्मचारी खूनप्रकरण
माजरी : वेकोलिची महिला कर्मचारी बातुनी अमीर अली शेख यांचा खून होवून चार दिवस उलटले तरी माजरी पोलिसांना आरोपींचा शोध गेण्यात यश आले नाही. पोलिसांची चौकशी सुरू आहे.
मृत बातुनी अमीर अली शेख यांचे शेजारी सांगतात की, ती शांत स्वभावाची होती. तिचे सर्वांशी चांगले संबंध होते. मग त्यांचा खून करून कोणता लाभ व उद्देश असेल, हे कोड कोडच आहे. मृत बातुनी अमीर अली शेख या दुपारी कार्यालयीन सुटीमध्ये घर परत जात होत्या. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर वजनी शस्त्राने वार करण्यात आला.
या प्रकरणात पोलीस काहीही बोलण्यास तयार नाहीत. ते म्हणतात चौकशी सुरू आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसानी मृत महिलेचा मुलगा अनीस खान अमीर अली शेख व त्याचा साळा आजाद आलम यांचे मोबाईल जमा करण्यास सांगीतले असता त्यांनी हरविले म्हणून माहिती दिली. त्यांनी मोबाईल जमा केलेला नाही. पोलिसांकडूनच गुप्त माहिती मिळाली की, मृत महिलेचा मुलगा अनिस खान अमीर अली शेख व त्याचा सासरा जलालुद्दीन शाह यांची चौकशी सुरू आहे. तसेच इतर नातेवाईक फिरोज आलम अनिस खान जलालुद्दीन शाह व काही महिलांची माजरी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात येत आहे. मृत महिलेचे कुटुंबीय व नातेवाईक पोलीस तपासात सहकार्य करीत नसल्याची माहिती आहे. (वार्ताहर)

Web Title: After four days, the accused will be free