शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३४ वर्षांनंतर भद्रावतीला मिळाला गावचा आमदार

By admin | Updated: October 25, 2014 01:14 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्राला राजकीयदृष्ट्या विशेष महत्व आहे. मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, वन महामंडळाचे अध्यक्ष याच क्षेत्रातून झाले.

माजरी : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्राला राजकीयदृष्ट्या विशेष महत्व आहे. मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, वन महामंडळाचे अध्यक्ष याच क्षेत्रातून झाले. मात्र भद्रावतीकरांना कधी संधी मिळाली नाही. यावेळी प्रथमच भद्रावतीला गावचा आमदार मिळाला आहे.वरोरा व भद्रावती या दोन तालुक्यांचा परिसर मिळून वरोरा विधानसभा क्षेत्र बनविला आहे. हे क्षेत्र पूर्वी भद्रावती विधानसभा क्षेत्र होते. वरोरा शहरापेक्षा भद्रावती शहराची लोकसंख्या अधिक आहे. भद्रावती शहरात धार्मिक व ऐतिहासिक, पौराणिक प्रसिद्ध स्थळ आहेत. कोळसा खाणी, आयुध निर्माणी व इतर लहान-सहान उद्योग आहेत. ही सर्व जमेची बाजू असताना या विधानसभेचे नाव बदलवून वरोरा विधानसभा क्षेत्र करण्यात आले.सन १९७८ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर भद्रावतीचे रहिवासी निळकंठ शिंदे यांनी भद्रावती विधानसभेची जागा जिंकली होती. यानंतर भद्रावतीकरांना शहरातला आमदार मिळाला नव्हता. दोनदा अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, त्यानंतर सतत चार वेळा संजय देवतळे यांना संधी मिळाली. मात्र यावेळी नवनिर्वाचित आमदार बाळु धानोरकर हे भद्रावतीचे रहिवासी आहेत.भद्रावती शहरातला रहिवासी आमदार मिळण्यासाठी भद्रावतीकरांना तब्बल ३४ वर्ष प्रतीक्षा करावी लागली. अखेर आ. धानोरकर यांच्या रूपाने संधी प्राप्त झाली आहे.वरोरा विधानसभा क्षेत्र नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र या बालेकिल्ल्याला आता भगदाड पडले आहे. या निर्वाचन क्षेत्रात शेती सिंचन व्यवस्था, नियमित विद्युत पुरवठा, वाढती बेरोजगारी, ग्रामीण क्षेत्रात बसफेऱ्या, माजरीला ३३ केव्ही वीज उपकेंद्र, मोठ्या अ दर्जाच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, माजरीला तालुक्याचा दर्जा, प्रत्येक गावात क्रीडांगण, विद्युत, वीज, पाणी आदी महत्वाच्या प्रमुख समस्या आहेत. (वार्ताहर)