ब्रह्मपुरीतील ‘त्या’ खड्ड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे शपथपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 06:00 AM2019-10-30T06:00:00+5:302019-10-30T06:00:09+5:30

ब्रह्मपुरी येथील नागरे हॉस्पिटलला लागून असलेल्या परिसरात माजी नगरसेवकाचे पुत्र साहब लाखानी यांनी स्वत:ची इमारत बांधण्याकरिता ७० फुट लांब ४० फुट रूंद असा २० फुट खोल खड्डा खोदला होता. यासाठी त्यांनी नगरपरिषदेकडून परवानगीच घेतली नव्हती. या खड्ड्याच्या बाजूला अनेक इमारती आहे. पावसामुळे या खड्ड्यात पाणी भरले होते.

Affidavit should be submitted by the Collector regarding the 'pits' in Brahmapuri | ब्रह्मपुरीतील ‘त्या’ खड्ड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे शपथपत्र

ब्रह्मपुरीतील ‘त्या’ खड्ड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे शपथपत्र

googlenewsNext
ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा आदेश : मुख्याधिकाऱ्यांनाही ठरविले जबाबदार

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभी ब्रह्मपुरी शहरातील डॉ. नागरे हॉस्पिटलजवळ परवानगी न घेता मोठा खड्डा खोदण्यात आला होता. नागरिकांनी यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या प्रकरणात न्या. आर. के. देशपांडे व न्या. विनय जोशी यांनी न. प. च्या मुख्याधिकाºयांना दोषी ठरविले. शिवाय, काहीच कारवाई न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीही शपथपत्र दाखल करावे, असे आदेश दिला. या आदेशामध्ये जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
ब्रह्मपुरी येथील नागरे हॉस्पिटलला लागून असलेल्या परिसरात माजी नगरसेवकाचे पुत्र साहब लाखानी यांनी स्वत:ची इमारत बांधण्याकरिता ७० फुट लांब ४० फुट रूंद असा २० फुट खोल खड्डा खोदला होता. यासाठी त्यांनी नगरपरिषदेकडून परवानगीच घेतली नव्हती. या खड्ड्याच्या बाजूला अनेक इमारती आहे. पावसामुळे या खड्ड्यात पाणी भरले होते. त्यामुळे जवळच असलेल्या गणेश कात्यायन, श्रीपाद जोशी व प्रतीक रत्नपारखी यांची घरे कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी लाखानीविरूद्ध मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. कारवाईच्या नावावर लाखानीला तीनदा नोटीस बजावण्यात आली. परंतु, नगर परिषद प्रशासनाने खड्डा बुजविण्याची कारवाईच केली नाही. परिणामी तक्रारकर्त्यांनी नगर परिषदेच्या निष्क्रियतेविरूद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली.
न्या. आर. के. देशपांडे, न्या. जोशी यांनी सुनावणीदरम्यान परिसरातील नागरिकांचे सार्वजनिक हित लक्षात घेऊ न नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांना दोषी ठरविले. विशेष म्हणजे या प्रकरणात प्रशासनाने काय कार्यवाही केली, याबाबत जिल्हाधिकाºयांनी न्यायालयात शपथपत्र दाखल करावे, असा आदेश दिला आहे.

अखेर माजी नगरसेवकपुत्रावर फौजदारी गुन्हा
नगर परिषदेकडे तक्रार करूनही खड्डा खोदणाºयावर कारवाई झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मुख्याधिकाºयांना जबाबदार धरून जिल्हाधिकाºयांनी शपथपत्र दाखल करण्याचा आदेश दिला. दरम्यान नगरपरिषद प्रशासनाच्या तक्रारीवरून माजी नगरसेवकाचे पुत्र साहब लाखानी याच्याविरूद्ध ब्रह्मपुरी पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Affidavit should be submitted by the Collector regarding the 'pits' in Brahmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.