पीक कर्जासाठी आदिवासी कोलामांचे हेलपाटे

By Admin | Updated: September 5, 2015 01:11 IST2015-09-05T01:11:47+5:302015-09-05T01:11:47+5:30

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कृष्णा वैनगंगा ग्रामीण बँक शाखा अधिकारी जिवती यांच्या मनमानी कारभारामुळे खडकी,....

Adult tribal helm for crop loan | पीक कर्जासाठी आदिवासी कोलामांचे हेलपाटे

पीक कर्जासाठी आदिवासी कोलामांचे हेलपाटे

शाखा अधिकाऱ्यांची मनमानी : खातेदारांना अपमानास्पद वागणूक
जिवती: तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कृष्णा वैनगंगा ग्रामीण बँक शाखा अधिकारी जिवती यांच्या मनमानी कारभारामुळे खडकी, रायपूर येथील आदिवासी कोलामांना पीक कर्जासाठी अनेक दिवसापासून बँकेचे हेलपाटे मारावे लागत आहे. याबाबत विचारणा करणाऱ्या आदिवासी कोलामांना अपमानास्पद वागणूक देतात. कर्ज द्यायचे, नाही द्यायचे हे आमच्यावर आहे. तुम्ही कुठेही जा, आमचे काहीच बिघडवू शकत नाही, असे ते बोलत असून कोलामांना वेटीस धरणाऱ्या दोषी शाखा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शेतीच्या कामासाठी पीक कर्जाची मागणी करणाऱ्या नागरीकांना तत्काळ पीक कर्ज देण्यात यावे, असे शासनाचे आदेश असतानाही येथील शाखा अधिकाऱ्यांनी आपली मनमानी चालवीत आदिवासी कोलामांना वेटीस धरत आहे. सध्या शेतातील पिकांना फळधारणा व पिकाची वाढ व्हावी, यासाठी रासायनिक खत, फवारणीसाठी कीटकनाशक औषधी खरेदी करण्यासाठी त्यांना पैसाची गरज निर्माण झाली.
त्यामुळे त्या नागरिकांनी पीक कर्जाची मागणी केली. मात्र चकरा मारुनही मिळत नसल्याने पहाडावरील शेतकरी व आदिवासी कोलाम हतबल झाले आहेत. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने शाखा अधिकारी यांना विचारले असता, आमचे काम सुरळीत चालू आहे. कोणाला कधी कर्ज द्यायचा तो आम्ही ठरवू या. संदर्भात वारंवार चर्चा करण्यासाठी येऊ नका, असे उद्धटपणे उत्तर दिले. पीक कर्ज देण्यासाठी विलंब करणाऱ्या अशा शाखा अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मारोती सिगम यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Adult tribal helm for crop loan