जडवाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:32 IST2021-09-06T04:32:45+5:302021-09-06T04:32:45+5:30
चंद्रपूर : क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. परिणामी नागरिकांना नाहक ...

जडवाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
चंद्रपूर : क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्लास्टिकचा वापर वाढला
चंद्रपूर : जिल्ह्यात बहुतांश शहरांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. विशेषत: व्यावसायिक ग्राहकांना बिनदिक्कतपणे पिशव्या देत आहेत. पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने युज अँड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
ग्रामीण भागातील ऑटो व्यवसाय संकटात
चंद्रपूर : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी बेकारीवर मात करण्यासाठी ऑटो व्यवसायाकडे धाव घेतली. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे ऑटो व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे घरखर्च कसा भागवायचा असा प्रश्न सध्या ऑटो चालकांना पडला आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करावा
चंद्रपूर : इरई धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असूनही चंद्रपूर शहरातील काही भागात अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील काही प्रभागात नळाद्वारे अत्यंत कमी पाणी सोडले जाते. अर्धा-एक तासातच नळाची धार बारीक होत असल्याने पाणीच मिळत नाही.