श्रीच्या आगमनासाठी प्रशासन सज्ज
By Admin | Updated: August 28, 2014 23:40 IST2014-08-28T23:40:51+5:302014-08-28T23:40:51+5:30
उद्या शुक्रवारी गणेश चतुर्थी, श्रीच्या स्थापनेचा दिवस. लाडक्या गणरायाच्या आगमनाने गणेशभक्त गुरूवारपासून प्रफुल्लीत झाले आहेत. जिल्हा प्रशासनानेही यासाठी तयारी केली असून पोलीस विभागही

श्रीच्या आगमनासाठी प्रशासन सज्ज
चंद्रपूर : उद्या शुक्रवारी गणेश चतुर्थी, श्रीच्या स्थापनेचा दिवस. लाडक्या गणरायाच्या आगमनाने गणेशभक्त गुरूवारपासून प्रफुल्लीत झाले आहेत. जिल्हा प्रशासनानेही यासाठी तयारी केली असून पोलीस विभागही सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज झाला आहे. गणेशोत्सवामुळे जिल्हाभर उत्साहाचे वातावरण आहे.
श्रावण महिना तसा सणासुदीचाच महिना. मात्र या महिन्यातील विशेष आकर्षण असते, गणेशोत्सवाचे. यंदाचा गणेशोत्सवही जिल्ह्यात धडाक्यात साजरा होणार आहे. गणेशोत्सवासाठी चंद्रपुरातील बाजारपेठ सजली आहे. डेकोरेशनचे साहित्य, विजेचे नानाविध दिवे यांची दुकाने सर्वत्र लागली आहे. आज गुरुवारपासून गणेशमूर्र्तींचीही दुकाने लागली असून एकापेक्षा एक सरस मनमोहक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहे. घरगुती स्थापनेसाठी अनेकांनी आजपासून आपापल्या मूर्ती आरक्षित करून ठेवल्या आहेत. तर काहींनी आजच गणरायाला आपल्या घरात नेले आहे. शुक्रवारी विधीवत श्रीची स्थापना केली जाणार आहे. त्यामुळे आजपासून गणेशभक्तांनी पूजेचे साहित्य, प्रसादांची खरेदी करणे सुरू केले आहे. त्यामुळे आज बाजारपेठ अक्षरश: फुुलली होती.
गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरुपातही साजरा केला जातो. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनीही तयारी सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. ठिकठिकाणी देखावे तयार करण्यात येत आहे. उद्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अतिशय उत्साहात श्रीची स्थापना करण्यात येणार आहे.
सध्या चंद्रपूरच्या अनेक रस्त्यांचे बांधकाम झालेले आहे. त्यामुळे गणरायाचा प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे. तरीही महानगरपालिकेने ज्या रस्त्यांवर खड्डे असतील, ते बुजविण्याचे काम सुरू केले आहे. (शहर प्रतिनिधी)