अवैध गौण खनिज खणन व वाहतुकीवर प्रशासनाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST2021-01-16T04:33:29+5:302021-01-16T04:33:29+5:30

पोकलँड मशीन जप्त :इरई, झरपट नदीपात्रात कारवाई चंद्रपूर : जिल्ह्यात मागील चार दिवसामध्ये अवैध गौण खनिज खणन ...

Administration cracks down on illegal secondary mining and transportation | अवैध गौण खनिज खणन व वाहतुकीवर प्रशासनाची धडक

अवैध गौण खनिज खणन व वाहतुकीवर प्रशासनाची धडक

पोकलँड मशीन जप्त :इरई, झरपट नदीपात्रात कारवाई

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील चार दिवसामध्ये अवैध गौण खनिज खणन व वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाने धडक दिली. यामध्ये एक पोकलँड मशीन व व्यागन ड्रील मशीनसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा खनिकर्म अधिकारी, खनिज विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयातील भरारी पथकाने भेट दिली असता ईरई व झरपट नदीच्या पात्रात अवैध माती मिश्रित रेती वाहतूक केली जात होती. यावेळी वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी विना परवाना रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर क्र. एमएच ३४ एफ०५५०, एमएच ३४ एफ ६१५, एमएच ३४ एपी ११४०, एमएच ३४ एफ १६६ असे चार ट्रॅक्टर जप्त करून आरवटचे पोलीस पाटील सचिन भालचंद्र दुधे यांच्याकडे सुपूर्दनाम्यावर सुपूर्द करण्यात आलेले आहे. या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, वर्धा नदीच्या हल्ला घाटावर २४ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता पांझुर्णी येथील सर्व्हे नंबर १२२ मध्ये दगड या गौण खनिजाचे विना परवाना अवैध उत्खनन केले जात होते. विना परवाना अवैध खणन वाहतूक करणाऱ्या पोकलँड मशीन झेडएएक्सटी १२० एच हायवा क्र. एमएच १३ सीयु ६६६७ व एक व्यागन ड्रील मशीन जप्त करण्यात आली. या वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -१९६६ च्या कलम ४८ च्या पोट कलम (७) (८) च्या तरतुदीअन्वये पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.

Web Title: Administration cracks down on illegal secondary mining and transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.