स्वाईन फ्लूबाबत प्रशासन अलर्ट
By Admin | Updated: February 22, 2015 00:54 IST2015-02-22T00:54:09+5:302015-02-22T00:54:09+5:30
सध्या स्वाईन फ्लू या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. स्वाईन फ्लूबाबत काही खबरदारी घेतल्यास या आजारापासून बचाव करणे शक्य होणार आहे.

स्वाईन फ्लूबाबत प्रशासन अलर्ट
चंद्रपूर : सध्या स्वाईन फ्लू या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. स्वाईन फ्लूबाबत काही खबरदारी घेतल्यास या आजारापासून बचाव करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्ल्यू आजारांवरील औषधे उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. नागरिकांनी स्वाईन फ्लू या आजारापासून बचाव करण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पाच वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील वरिष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा हृदय रोग, मधुमेह, फुफ्फूस, यकृत, मूत्रपिंडाचे आजार असलेले व्यक्ती व अति जोखमीच्या व्यक्तीमध्ये स्वाईन फ्लू गंभीर रुप धारण करु शकतो. हा आजार टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुणे, पोस्टीक आहार घेणे, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री व हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थाचा आहारात वापर करणे, धुम्रपाण टाळणे, पुरेसी झोपणे, असे प्रतिबंधात्मक उपाय सूचविले.
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, चिमूर, मूल व वरोरा येथे औषधउपचार, तपासणी, स्वाब घेणे या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच इन्फ्लुएंझाची लस, इंजेक्शन व स्प्रेच्या स्वरुपात उपलब्ध आहेत. सर्व खासगी रुग्णालयांना स्वाईन फ्लू उपचाराची मान्यता आहे. (शहर प्रतिनिधी)