शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनंतरच समायोजनाची कार्यवाही करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:28 IST2021-04-08T04:28:47+5:302021-04-08T04:28:47+5:30

सास्ती : जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात येत्या १० एप्रिलपर्यंत शिक्षण विभागाने माहिती मागितली आहे. समायोजन करण्याच्या दृष्टीने ही माहिती ...

Adjustment should be done only after promotion of non-teaching staff | शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनंतरच समायोजनाची कार्यवाही करावी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीनंतरच समायोजनाची कार्यवाही करावी

सास्ती : जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात येत्या १० एप्रिलपर्यंत शिक्षण विभागाने माहिती मागितली आहे. समायोजन करण्याच्या दृष्टीने ही माहिती कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक ठरणारी असून, पदोन्नतीनंतरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

जिल्ह्यातील सन २०१८-२०१९ च्या शिक्षकेतर संचमान्यतेनुसार शाळेतील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, प्रयोगशाळा सहायक या पदांचे संस्थास्तरावर समायोजन करून उर्वरित अतिरिक्त कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण विभाग माध्यमिक यांनी मागितलेली आहे.

परंतु, जिल्ह्यातील विविध संस्था व शाळांनी सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक पदांवर पदोन्नती देऊन त्यांचे प्रस्ताव मान्यतेकरिता शिक्षण विभागाकडे सादर केले होते. परंतु ते सर्व प्रस्ताव प्रलंबित असल्याने आणि या सर्व पदास सन २०१८-२०१९ च्या शिक्षकेतर संचमान्यतेनुसार मंजुरी असल्याने जिल्ह्यातीच समायोजनाची माहिती ही कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक ठरणारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संस्थेचे जिल्हा अध्यक्ष मोरेश्वर वासेकर, कार्याध्यक्ष अशोक पिंपळकर, सचिव प्रशांत हजारे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

Web Title: Adjustment should be done only after promotion of non-teaching staff