कंत्राटी आरोग्य सेविकांचे समायोजन करा
By Admin | Updated: August 28, 2016 00:42 IST2016-08-28T00:42:31+5:302016-08-28T00:42:31+5:30
२००५- ०६ पासून एनआरएचएम अंतर्गत अधिकारी व कर्मचारी अत्यल्प मानधनावर कंत्राटी तत्त्वावर काम करीत आहेत.

कंत्राटी आरोग्य सेविकांचे समायोजन करा
निवेदन : कुनघाडा रै., अहेरी, धानोरा येथील कर्मचाऱ्यांची मागणी
अहेरी/तळोधी (मो.)/धानोरा : २००५- ०६ पासून एनआरएचएम अंतर्गत अधिकारी व कर्मचारी अत्यल्प मानधनावर कंत्राटी तत्त्वावर काम करीत आहेत. दहा वर्षांचा कालावधी उलटूनही कर्मचाऱ्यांना अद्यापही सेवेत कायम करण्यात आले नाही. कंत्राटी आरोग्य सेविकांना सेवेत कायम करून त्यांना समान वेतन द्यावे, अशी मागणी कुनघाडा रै. अहेरी, धानोरा येथील कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
अहेरी - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी सकाळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी, उपजिल्हा रूग्णालयाचे वैैद्यकीय अधीक्षक यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील लेखापाल बी. एस. अलोणे, कार्यक्रम सहायक प्रतिभा थुल, आरोग्य सेविका संगीता महालदार, सर्पराज पठाण, मयूरी रामटेके, प्रियंका राठोड, सत्यमा चटारे, वंदना मडावी, प्रेमिला गलबले, सुनीता गुडपवार, नीतू सिंग, उपजिल्हा रूग्णालयातील कांचनवार, पोरेड्डीवार, गोंगले व कर्मचारी उपस्थित होते.
तळोधी (मो) - दहा वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर आरोग्य सेविका काम करीत आहेत. परंतु त्यांचे अद्यापही समायोजन झालेले नाही. शिवाय त्याबरोबर समान वेतनही मिळाले नाही. यासह विविध प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे सदर प्रश्न तत्काळ मार्गी लावावे, अशी मागणी कुनघाडा रैै. कंत्राटी आरोग्य सेविकांच्या वतीने पं. स. सभापती शशिकला चिळंगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले.