तसेच अनुचित प्रकारावर आळा घालण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी भरारी पथकाचीसुद्धा नेमणूक केली आहे. या भरारी पथकामध्ये मंडळ निरीक्षक घनश्याम मेश्राम, पोलीस अधिकारी ज्ञानेन्द्र तिवारी व त्यांचे पथक तसेच तीन तलाठ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
बुधवारी सायंकाळी ५ वाजतापासून प्रचाराची तोफ थंडावत असल्याने आता उमेदवारांचा गुप्त प्रचार सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अवैध मार्गाचा अवलंब करून मतदारांना आमिष दाखवून मत परिवर्तित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून उमेदवाराने व गावकऱ्यांनी सावधान राहावे, असा प्रकार निर्दशनास आल्यास तहसील कार्यालयात कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे; तिथे संपर्क साधून याबाबतची माहिती किंवा तक्रार द्यावी असे आवाहन निवडणूक अधिकारी व तालुका दंडाधिकारी बल्लारपूर यांनी केले आहे.
कोट
३८ मतदान केंद्रावर चार क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत पोलीस विभागाच्या सहाय्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच एक भरारी पथकाचीसुद्धा नेमणूक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्यांनी त्याची माहिती पथकाला द्यावी.
- संजय राईंचवार, निवडणूक अधिकारी तथा तालुका दंडाधिकारी बल्लारपूर.