जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST2021-08-24T04:32:27+5:302021-08-24T04:32:27+5:30

चंद्रपूर :मागील २४ तासात जिल्ह्यात पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच दोन ...

Addition of two corona sufferers in the district | जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांची भर

जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांची भर

चंद्रपूर :मागील २४ तासात जिल्ह्यात पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच दोन रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या रुग्णांमध्ये राजुरा येथील दोघांचा समावेश आहे. तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर तालुका, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड , सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी एकही रुग्ण आढळला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६०६ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार १७ झाली आहे. सध्या ५० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ६० हजार ७७५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ५ लाख ७० हजार ६१९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५३९ बाधितांचे मृत्यू झाले आहे.

Web Title: Addition of two corona sufferers in the district