नव्या १८५ बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 05:00 AM2020-10-24T05:00:00+5:302020-10-24T05:00:35+5:30

शुक्रवारी जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील सुमित्रा नगर येथील ४० वर्षीय पुरुष व बल्लारपूर शहरातील झाकीर हुसेन वार्ड येथील ७३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१३ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २०२ बाधिताचा समावेश आहे.

Addition of 185 new victims | नव्या १८५ बाधितांची भर

नव्या १८५ बाधितांची भर

Next
ठळक मुद्देजिह्यात तीन हजार ३७ ॲक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात शुक्रवारी १८५ नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या १४ हजार ३८७ वर पोहोचली आहे. तसेच शुक्रवारी १२३ बाधित कोरोनातून बरे झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ११ हजार १३७ झाली आहे. सध्या तीन हजार ३७ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १३ हजार ७६५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ९७ हजार ८२५ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
शुक्रवारी चंद्रपूर शहरातील व परिसरातील आंबेडकर नगर बाबुपेठ, बालाजी वार्ड, पठाणपुरा वार्ड, बाजार वार्ड, ओमकार नगर, हॉस्पिटल वार्ड, गोपाल पुरी, वडगाव, लक्ष्मी नगर, इंदिरानगर, कृष्णा नगर, गणेश नगर, स्वावलंबी नगर, सौगात नगर, भिवापुर वॉर्ड, रयतवारी कोलरी परिसर, सिद्धार्थ नगर, विकास नगर, ऊर्जानगर, गुरु नगर, अष्टभुजा वार्ड, लुंबिनी नगर, महेश नगर, संगीत नगर, भाना पेठ वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.
यासोबतच बल्लारपूर तालुक्यातील साईबाबा वार्ड, गौरक्षण वार्ड, बिल्ट कॉलनी परिसर, विसापूर, विद्यानगर वार्ड, सुभाष वार्ड भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसर, बावणे लेआउट, माजरी खदान परिसर, अभ्यंकर वार्ड, करंजी, शांतीवन परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील सुंदर नगर, नवेगाव पांडव, विद्यानगर, भगतसिंग वार्ड, सुलेझरी, रमाबाई चौक, शांतीनगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील स्नेहल नगर, गुरु नगर, सुरक्षा नगर, शिवाजीनगर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील चुनाभट्टी वार्ड, विहिरगाव,भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील क्रांतीनगर,डोमा भागातून बाधित ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील तातेवार सभागृह परिसर, नवरगाव, अंतरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील बाळापूर, सावरगाव, कन्हाळगाव, तळोधी, सुलेझरी, नवेगाव पांडव भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, काटलबोडी भागातून बाधित ठरले आहे.

आणखी दोघांचा मृत्यू
शुक्रवारी जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील सुमित्रा नगर येथील ४० वर्षीय पुरुष व बल्लारपूर शहरातील झाकीर हुसेन वार्ड येथील ७३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१३ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २०२ बाधिताचा समावेश आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या
जिल्ह्यात शुक्रवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये ११३ पुरूष व ७२ महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील ७५ बाधित, बल्लारपूर तालुक्यातील आठ, चिमूर तालुक्यातील तीन, मूल तालुक्यातील चार, गोंडपिपरी तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील १५, ब्रह्मपुरी तालुक्यातील १२, नागभीड तालुक्यातील १८, वरोरा तालुक्यातील १५, भद्रावती तालुक्यातील सहा, सावली तालुक्यातील पाच, सिंदेवाही तालुक्यातील १३, राजुरा तालुक्यातील ३, गडचिरोली येथील पाच तर यवतमाळ व राजस्थान येथील प्रत्येकी एक असे एकूण १८५ बाधित पुढे आले आहे.

Web Title: Addition of 185 new victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.