राष्ट्रसंताना महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करा
By Admin | Updated: September 25, 2014 23:21 IST2014-09-25T23:21:50+5:302014-09-25T23:21:50+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव महापुरूषांच्या यादीत घेण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी मूल व ब्रह्मपुरी येथे गुरूदेवभक्तांनी तहसीलदारांना निवेदन दिले.

राष्ट्रसंताना महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करा
चंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव महापुरूषांच्या यादीत घेण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी मूल व ब्रह्मपुरी येथे गुरूदेवभक्तांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
१५ आॅगस्ट १९४७ रोजी इंग्रजाच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला. मात्र त्या आधीच १४ ते १६ आॅगस्ट १९४२ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना’ या प्रेरक भजनाने स्वातंत्र्य संंग्रामाचे स्फूर्ती केंद्र जागे होवून चिमूर, आष्टी, यावली, बेनोडा ही गावे तीन दिवस इंग्रज राजवटीतून मुक्त होते. चीन, पाकिस्तान युद्धात सिमेवरील जवानांना प्रेरणा देणारे तुकडोजी महाराज हे एकमेव संत होते. परंतु देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात तसेच भारत देशाच्या राष्ट्रपुरुषांच्या यादीत अजूनपर्यंत राष्ट्रसंताच्या नावाचा उल्लेख नाही.
राष्ट्रसंताच्या नावाचा राष्ट्रपुरुषांच्या यादीत समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी मूल येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका शाखेच्यावतीने तहसीलदारांच्या माध्यमातून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रघुनाथ पडोळे, श्यामराव मोहुर्ले, शरद सहारे, रमेश बोरुले, तुपकर, नामदेव गावतुरे, अंबादास राजनकर, नामदेव पिजदूरकर, कवडू शेंडे, हरी सोनुले, आशन्ना चौधरी, चेतानंद कवाडकर, खुशाल मसराम, सखाराम उरकुडे, ेउपस्थित होते. (प्रतिनिधी)