खडसंगीला ‘बफरझोन’ क्षेत्रात समाविष्ट करा
By Admin | Updated: July 31, 2015 01:30 IST2015-07-31T01:30:53+5:302015-07-31T01:30:53+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांचा समावेश व्याघ्र सीमा बफर झोनमध्ये आहे.

खडसंगीला ‘बफरझोन’ क्षेत्रात समाविष्ट करा
वनमंत्र्याना निवेदन : भीमशक्ती युवक संघटनेची मागणी
खडसंगी : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांचा समावेश व्याघ्र सीमा बफर झोनमध्ये आहे. मात्र या गावांमधील विद्यार्थ्यांना अनेक बफर झोनच्या (वन विभागाच्या) सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे खडसंगी गावाचा समावेश बफर झोन गावाच्या यादीत समावेश करण्याची मागणी खडसंगी येथील भीमशक्ती युवक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
देशात वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये हमखास वाघाचे दर्शन होते. त्यामुळे लाखो पर्यटक या प्रकल्पाला भेटी देतात. त्यामुळे वनविभागाला या पर्यटकाकडून लाखो रुपयाचा महसूल मिळतो. मात्र या प्रकल्पापासून बाधीत झालेले अनेक गावाचा समावेश बफर झोन गावाच्या यादीत समावेश करण्यात आला. त्यामुळे या गावातील नागरिकांना व्याघ्र प्रकल्पाच्या सुविधा मिळत आहेत.
मात्र खडसंगीमध्येच बफर झोन वनविभागाचे कार्यालयसुद्धा आहे. तर व्याघ्र प्रकल्पाची सीमा खडसंगी गावाच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहे. तरी मात्र खडसंगी गावाचा समावेश बफर झोन क्षेत्राच्या गावाच्या यादीत नाही. त्यामुळे खडसंगी गाव वन्य प्राण्याच्या हैदोसाने व्यथित आहे. तर अनेकांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.
या बाबीची दखल घेवून ग्रामपंचायत कार्यालयाने मागील ग्रामसभेत खडसंगीचा बफर झोनमध्ये समावेश करण्याचा ठराव घेतला आहे. त्यामुळे शासनाने या गावाचा समावेश बफर झोन क्षेत्रात करावा, या मागणीचे निवेदन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भीमशक्ती युवक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप रामटेके, आशीष गजभिये, अमन फुलझेले, विपीन गजभिये, आशीष राऊत, सचिन सोनटक्के, संजय रामटेके, गौतम रामटेके, कुणाल रामटेके, प्रफुल्ल मेश्राम, प्रफुल्ल रामटेके, आनंद जांभुळे आदी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)