चंद्रपूर : चंद्रपूर ते नागपूर महामार्ग तसेच पडोली ते यवतमाळ राज्य मार्गावरील डिवायरमध्ये रोपे तसेच रेडियम पेंट नसल्याने अपघाताची शक्यता आहे. यासंदर्भात सातत्याने मागणी करण्यात आली आहे. विशेषत: सामाजिक कार्यकर्ते ईबादुल हसन सिद्धीकी यांनी ही मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रेटून धरल्यानंतर जागे झालेल्या भद्रावती सार्वजिनक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर टोलरोड कंपनीला पत्र पाठवून या रस्त्यावर रेडियम पट्टे तसेच डिवायडरमध्ये रोपे लावण्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, सात दिवसांत कामाला सुरुवात न केल्यास करारनाम्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे.
चंद्रपूर ते नागपूर महामार्ग व पडोली ते यवतमाळ राज्य महामार्गावर काही ठिकाणी त्रुट्या आहेत. अनेक ठिकाणी फर्लांग दगड, किमी दगड नाही. तर गतिरोधक असल्याचे सावधान फलकसुद्धा नाही. काही ठिकाणी रस्त्याचा पृष्ठभाग दबलेला आहे. विशेषत: भद्रावती व मोरवा जवळ रस्ता दबल्यामुळे उंचवटे तयार झाले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे, तर याच रस्त्यावर काही ठिकाणी पेंट पट्टे मारले नाही. गतिरोधक पट्टे, चिन्हांकातील पेेंट सुद्धा निघाले आहे. रस्ता दुभाजकाला रेडिमय पेेंट मारला नसल्याने रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुभाजकावर बऱ्याच ठिकाणी झाडे नसल्यामुळे रात्रीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांच्या लाइटमुळे समोरील रस्ता दिसत नाही. त्यामुळे रस्त्या दुभाजकावर ५ फुट उंचीचे फूलझाडे १.५० मी. अंतरावर लावणे गरजेचे आहे. मोरी किंवा पुलाच्या सुरुवात व नंतर डांबराची लेवर नसल्याने अपघाताची शक्यता आहे.
वरोरा, भद्रावती, सुमठानणा, घोडपेठ, पडोली येथील रोवापथकावर खड्डे आहे तसेच काटेरी झाडे झुडपे असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती सात दिवसांच्या आत करावी, अन्यथा करारनाम्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे पत्र भद्रावती सार्वजिनक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर टोलरोड कंपनीला दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हे रस्ता चकचकीत दिसेल, अशी अपेक्षा नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते ईबादुल हसन सिद्धीकी यांनी व्यक्त केली आहे.
बाॅख्स
पाच फुटांचे झाडे लावण्याची सक्ती
डिवायडरमध्ये झाडे नसल्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाच्या लाइटमुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे रस्त्याच्या डिवायडरमध्ये किमान पाच फुट उंच असलेल्या फूलझाडांना लावण्याची मागणीही करण्यात आली आहे.