शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

रात्री दहानंतर लाऊडस्पीकर लावाल तर होईल कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:52 IST

सकाळी सहापासून परवानगी : पोलिसांची परवानगीही हवीच

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या प्रक्रियेला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू राहणार असून, ही निवडणूक विनाअडथळा व शांततेने पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या काळात लाऊडस्पीकर वापरण्यावर आयोगाने निर्बंध घातले आहेत.

यानुसार रात्री दहानंतर लाऊडस्पीकर लावल्यास कारवाई होऊ शकते. विधानसभा निवडणूक कालावधीत उमेदवारांकडून शहर तसेच ग्रामीण भागातही स्पीकरद्वारे प्रचार यंत्रणा राबविली जाते. याच अनुषंगाने निवडणूक आयोगाने काही निर्बंध लागू केले आहेत. यानुसार जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या हद्दीत कोणत्याही वाहनावर ध्वनिक्षेपक बसवून त्याचा वापर फक्त सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत तोही संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी यांची रितसर परवानगी घेऊनच करता येणार आहे. शिवाय, असा वापर करत असताना वाहन चालू ठेवून ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व प्रकारच्या ध्वनिक्षेपकांच्या वापरास वाहनावर बसवून किंवा अन्यप्रकारे दररोज सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी राहील. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, निवडणुकीचे उमेदवार किंवा ध्वनिक्षेपकाचा वापर वाहनावर बसवून किंवा प्रचार करणाऱ्या लोकांनी ध्वनिक्षेपकाच्या वापराचे परवानगी विवरण मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी व जवळच्या पोलिस ठाण्याला देणे बंधनकारक राहील. 

जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. यामध्ये चंद्रपूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. या विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रचार करताना उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनाही काळजी घ्यावी लागणार आहे. 

२५ नोव्हेंबरपर्यंत राहणार निर्बंध या आदेशाचा कोणीही कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. हा आदेश १५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघांच्या हद्दीत २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अमलात राहणार आहे

कारवाही होणार रात्री दहानंतर लाऊडस्पीकर लावल्यास संबंधितांवर कारवार्ड होणार आहे. यासाठी पोलिस प्रशासन लक्ष ठेवून राहणार आहे. तक्रारीची वाट न बघता थेट ते कारवाई करणार आहे. त्यामुळे लाऊडस्पीकर लावताना योग्य काळजी घेणे गरजचे आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूर