अतिक्रमणाच्या वादात दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: March 26, 2015 00:52 IST2015-03-26T00:52:21+5:302015-03-26T00:52:21+5:30
तालुक्यातील सुशी येथे माता मंदिरजवळ असलेल्या जागेबाबत मोजणी केल्यानंतर रितसर अतिक्रमण न काढता घाईघाईत अतिक्रमण काढल्याने दोन गटात ..

अतिक्रमणाच्या वादात दोन गटांत हाणामारी
मूल : तालुक्यातील सुशी येथे माता मंदिरजवळ असलेल्या जागेबाबत मोजणी केल्यानंतर रितसर अतिक्रमण न काढता घाईघाईत अतिक्रमण काढल्याने दोन गटात वाद उफाळला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाले आहे.
सुशी येथील माता मंदिराजवळ अशोक घडसे यांचे अतिक्रमण होते. जागेच्या मोजनी संदर्भात गावातील नागरिकांनी मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय मूल येथे अर्ज केल्यानंतर मोजणीसाठी कर्मचारी आले. जागेची मोजणी केल्यानंतर अतिक्रमण आहे, हे सिद्ध झाले. मात्र अतिक्रमण काढण्यासंदर्भात परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र काही नागरिकांनी घाई केल्याने मोजणी नंतरच अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाद उफाळला आणि दोन गटांत हाणामारी झाली.
ही वार्ता गावात पसरताच एका समाजाच्या नागरिकांनी सदर प्रकरण उचलले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. मूल पोलीसांनी यासंदर्भात १५ जणांवर कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ४२७ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. गावात तणावाचे वातावरण पसरल्याने दंगा नियंत्रण पथकाला गावात बोलाविण्यात आले. त्यामुळे तणाव शांत झाले. गावात पोलीस तैणात करण्यात आले असून पुढील तपास करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)