रेती वाहतूक करणाऱ्या १४ वाहनांविरुद्ध कारवाई

By Admin | Updated: January 18, 2016 00:48 IST2016-01-18T00:48:48+5:302016-01-18T00:48:48+5:30

येथील तहसीलदार धर्मेश फुसाटे व त्यांच्या चमूने गौण खनिज मोहीमेअंतर्गत रात्रभर जागून रविवारी पहाटे एकाच दिवशी रेतीची तस्करी करणारी १४ वाहने पकडली.

Action against 14 vehicles of sand transport | रेती वाहतूक करणाऱ्या १४ वाहनांविरुद्ध कारवाई

रेती वाहतूक करणाऱ्या १४ वाहनांविरुद्ध कारवाई

तहसीलदारांचा पुढाकार : ४ लाख ३५ हजारांचा दंड वसूल
राजुरा : येथील तहसीलदार धर्मेश फुसाटे व त्यांच्या चमूने गौण खनिज मोहीमेअंतर्गत रात्रभर जागून रविवारी पहाटे एकाच दिवशी रेतीची तस्करी करणारी १४ वाहने पकडली. या वाहनधारकांकडून ४ लाख ३५ हजार ९५० रुपये दंड वसूल केला.
आदिलाबाद येथील वाहन क्रमांक एपीओ-आयएक्स ३५५३ चे मालक प्रेमकुमार कांबळे यांच्याकडून ४७ हजार ४०० रुपये, वाहन क्रमांक एपीओ आयएक्स ६४५३ चे मालक रवी कोवा ४७ हजार ४००, राजु राठोड यांच्याकडून ४७ हजार ४००, वाहन क्रमांक एपी-२८-टीसी ३६०३ चे म मालक एस.के. कलीम यांच्याकडून ४७ हजार ४००, वाहन क्रमांक टीएस आययुए ४९८१ चे मालक सुब्दाला राजु यांच्याकडून ४७ हजार ४०० रुपये, वाहन क्रमांक एमएच ३४ एलबी ९४३० चे मालक शेख निजाम यांच्याकडून ३१ हजार ६००, वाहन क्रमांक एमएच ३४-२२एन २२५६ चे मालक बाबुराव पिते यांच्याकडून ४७ हजार ४००, वाहन क्रमांक एमएच -२४ जे ८०८० चे मालक संग्राम सलगर यांच्याकडून ३१ हजार ६००, वाहन क्रमांक एमएच ३४- ६७७३ चे मालक नुरमहमंद नजर महमद यांच्याकडून १५ हजार ८०० रुपये, वाहन क्रमांक एमएच ३४ एलबी ५८०० चे मालक कोमल मेश्राम यांच्याकडून ११ हजार ८५०, वाहन क्रमांक एमएच ३४- एस ९४१९ चे मालक अमजद भाई यांच्याकडून २३ हजार ७०० रुपये, वाहन क्रमांक एमएच ३४- एस ६७६५ चे मालक कमलाकर आसमपेल्लीवार यांच्याकडून ५ हजार ४०० रुपये, वाहन क्रमांक एमएच ३१- एस ८७७० चे मालक इरफान कोठारी यांच्याकडून १५ हजार ८०० रुपये असा एकून ४ लाख ३५ हजार ९५० रायल्टी व दंड वसुल करण्यात आला. या कारवाईमध्ये नायब तहसीलदार पी.एच. मरस्कोल्हे, नायब तहसीलदार किशोर साळवे, मंडळ अधिकारी प्रमोद कुलटे, तलाठी एस. राजपूत, सतिश साळवे, रवी रणदिवे, सुनिल रामटेके, दिनेश पत्तीवार, आदी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Action against 14 vehicles of sand transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.