जिल्ह्यातील आणखी हॉस्पिटल कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:26 IST2021-04-12T04:26:08+5:302021-04-12T04:26:08+5:30

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ...

Acquire more hospitals in the district for Kovid patients | जिल्ह्यातील आणखी हॉस्पिटल कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करा

जिल्ह्यातील आणखी हॉस्पिटल कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित करा

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर भार येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आणखी चार नवे हॉस्पिटल अधिग्रहित करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या.

रविवारी सकाळी गिरनार चौक येथे कोरोना सहायता कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोरोना रुग्णालयाची होणाऱ्या गैरसोयीबाबत खासदारांना माहिती देण्यात आली. याची दखल घेत धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अध्यक्ष तथा प्रबंधक निर्देशक वेकोली नागपूर, महाप्रबंधक आयुध निर्माणी चांदा, अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घुग्गुस येथील राजीव रतन रुग्णालय, लालपेठ येथील वेकोलीचे रुग्णालय, सास्ती, माजरी व आयुध निर्माणी चांदा येथील हॉस्पिटल अधिग्रहित करण्याच्या सूचना केल्या.

तालुकास्तरावर कोविड रुग्णालय उभारून वेकोलीचे लालपेठ, सास्ती, माजरी, घुग्गुस येथील राजीव रतन तसेच आयुध निर्माणी चांदा ही क्षेत्रिय रुग्णालय व उद्योगातील अंबुजा, माणिकगड, अल्ट्राटेक, ए.सी.सी, बिल्ट इंडस्ट्रीज येथील तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिकांची सेवा कोविड रुग्णांकरिता अनिवार्य करावी, ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता रुग्णांना उत्कृष्ट उपचाराकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे, आवाहन खासदार बाळू धानोरकर केले.

Web Title: Acquire more hospitals in the district for Kovid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.