तोंडखुरीची लागण; २५ मेंढ्यांचा मृत्यू

By Admin | Updated: August 29, 2016 01:19 IST2016-08-29T01:19:21+5:302016-08-29T01:19:21+5:30

गोंडपिपरी तालुुक्यातील तोहोगाव येथे मेंढ्यांना तोंडखुरी रोगाची लागण सुरू असून योग्य उपचाराअभावी दररोज दोन-तीन मेंढ्या मरत आहेत.

Acne infection; 25 sheep's death | तोंडखुरीची लागण; २५ मेंढ्यांचा मृत्यू

तोंडखुरीची लागण; २५ मेंढ्यांचा मृत्यू

तोहोगाव परिसरातील घटना : उपाचाराअभावी दररोज मरतात मेंढ्या
तोहोगाव : गोंडपिपरी तालुुक्यातील तोहोगाव येथे मेंढ्यांना तोंडखुरी रोगाची लागण सुरू असून योग्य उपचाराअभावी दररोज दोन-तीन मेंढ्या मरत आहेत. डॉक्टर मात्र आठवड्यातून एकदाच पशु वैद्यकीय रुग्णालयात येत असतात. डॉक्टरच्या गैरहजेरीमुुळे परिचराकडून उपचार सुरू असून आतापर्यंत या परिसरातील मेंढपाळाच्या २५ मेंढ्या मरण पावल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
तोहोगाव या परिसरात सर्वात जास्त पशुधन असल्यामुळे येथे पशु वैद्यकीय रुग्णालय श्रेणी-१ चे रुग्णालय २५ वर्षापासून आहे. या अगोदरचे सर्वच वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी निवासी असायचे व पशुधनावर योग्य उपचार करायचे. या रुग्णालयात तीन चतुर्थ कर्मचारी व एक वैद्यकीय अधिकारी अशी पदभरती असताना सुद्धा येथे सध्या एक वैद्यकीय अधिकारी व एक परिचर असे दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. येथे कार्यरत डॉक्टर तर आठवड्यातून एकदाच रुग्णालयात येतात. बाकी दिवस फोनवरच परिचराला उपचारासंबंधी सुचना देतात. परिचर फक्त रुग्णालयात आणलेल्या जनावरांवर थातुर-मातुर उपचार करते. तर गंभीर आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी घरी बोलावले तर पैसे घेतल्याशिवाय घरी येवून उपचार करीत नाहीत, असे पशुपालकांचे म्हणणे आहे.
येथील मेंढपाळांनी आपल्या बकऱ्या-मेंढ्या पशु वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने या परिचरांनी थातुर-मातुर औषधोपचार केला. त्यांच्या मेंढ्याना कसलाही फायदा झाला नाही. त्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तोंडखुरी रोगावर या वैद्यकीय रुग्णालयात औषधच नसल्याचे परिचर सांगत आहे. तोंडखुरीची लागण झालेल्या मेंढ्यांच्या तोंडातून चिकट द्रव पडत असून खाली मान टाकून मेंढी उभी असते. ती काहीच खात नाही. दोन दिवस तशीच राहते व तिसऱ्या दिवशी ती मृत पावते.
आजपर्यंत तोहोगाव येथील कविश्वर चिडे यांच्या ९ मेंढ्या, मेघराज चिडे यांचे ७, सुनील चिडे ५, मनोज चिडे यांच्या २ मेंढ्या मरण पावल्या आहेत. शेवटी या मेंढपाळाने तेलंगना राज्यातील कागजनगर येथून औषध विकत आणून खासगी डॉक्टरकडून उपचार सुरू केला आहे.
काही प्रमाणात तोंडखुरी रोग आटोक्यात आला. परंतु, तेवढी सुधारणा अजुनही झालेली नाही. या गंभीर रोगाकडे शासनाने लक्ष देवून मेंढपाळांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्यकारिणीने केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Acne infection; 25 sheep's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.