‘त्या’ आरोपीने केले आत्मसमर्पण
By Admin | Updated: April 20, 2015 01:11 IST2015-04-20T01:11:43+5:302015-04-20T01:11:43+5:30
तालुक्यातील भादुर्णी येथील बफरझोन परिक्षेत्रातील कक्ष क्र. ४८५ मधील झालेल्या वाघाची शिकार प्रकरणातील ...

‘त्या’ आरोपीने केले आत्मसमर्पण
मूल : तालुक्यातील भादुर्णी येथील बफरझोन परिक्षेत्रातील कक्ष क्र. ४८५ मधील झालेल्या वाघाची शिकार प्रकरणातील शेवटचा आरोपी पोलीस शिपाई गुरुदेव भिलकर याने रविवारी चिचपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात आत्मसमर्पण केले. हा पोलीस शिपाई हा १९ वा आरोपी असून प्रकरणातील शेवटचा आरोपी आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन परिक्षेत्रातील भादुर्णी येथील कक्ष क्र. ४८५ मध्ये वाघाची शिकार करण्यात आली. मूल येथील बसस्थानकाजवळ वाघाच्या अवयवाची विक्री करताना चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी व पर्यावरण मित्र उमेश झिरे यांनी सापळा रचून दिलीप श्रीहरी मडावी रा. भादुर्णी याला पकडले. मडावी यांच्या सांगण्यावरून १९ आरोपीला पकडण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. आरोपीकडून वाघाची १८ नखे, ४ दात व ९ मिशा जप्त करण्यात आल्या. आरोपींना पकडण्यासाठी चंद्रपूरचे सहायक वनसंरक्षक विवेक मोरे, वनपरिक्षेत्राधिकारी पठाण यांचे सहकार्य आहे. (तालुका प्रतिनिधी)