महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:30 IST2021-08-26T04:30:22+5:302021-08-26T04:30:22+5:30
२२ डिसेंबर २०१७ रोजी पोलीस स्टेशन चिमूरअंतर्गत येणाऱ्या नेरी येथील लग्नसमारंभात पीडित महिला बांगड्या भरण्यासाठी जात होती. दरम्यान, प्रवीण ...

महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस कारावास
२२ डिसेंबर २०१७ रोजी पोलीस स्टेशन चिमूरअंतर्गत येणाऱ्या नेरी येथील लग्नसमारंभात पीडित महिला बांगड्या भरण्यासाठी जात होती. दरम्यान, प्रवीण नगराळे याने तिला एकटे पाहून तिचा हात पकडून अश्लिील शब्दात बोलून विनयभंग केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन चिमूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपासी अंमलदार पोलीस हवालदार कविश्वर पुरके यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायधीशांनी साक्षीदार तपासून प्रवीण नगराळे याला दोन वर्षे शिक्षा, पाच हजार रुपये दंड तसेच फिर्यादीला आठ हजार रुपये देण्याची शिक्षा जेएमएससी कोर्टाचे रवींद्र भेंडे यांनी ठोठावली. सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. संंजय ठावरी, कोर्ट पैरवी म्हणून बलदेव कुमरे यांनी काम पाहिले.