शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीने उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातच घेतले विष; एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 15:27 IST

बनावट दारू प्रकरण : दोघे जण अटकेत, मुख्य आरोपी अद्यापही फरार

चंद्रपूर : मूल येथील बनावट देशी दारूचा कारखाना प्रकरणातील फरार आरोपीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी घडली. उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. राजू श्यामराव मडावी (२६, रा. बाबुपेठ) असे या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, आरोपी राजू हा शरण जाण्याच्या उद्देशाने कार्यालयात गेला असल्याचे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आली. यानंतर जिल्ह्यात बनावट दारूविक्री करणारे रॅकेट सक्रिय झाले. मूल तालुक्यातील चितेगाव येथील एका शेळीपालन केंद्रावर बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून अवैध दारू तयार करण्याचा कारखाना उधळून लावला. या प्रकरणात पोलिस पाटील गुरू संग्रामे आणि उमाजी झाडे या दोघांना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. तर पवन वर्मा, अरुणा मरस्कोल्हे व राजू मडावी हे तिघे घटनेनंतर फरार झाले होते. या तिघांचा उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून शोध सुरू होता. परंतु, पंधरा दिवस उलटूनही हे तिघे हाती लागले नाहीत.

उत्पादन शूल्क विभागाने फरार आरोपींच्या शोधासाठी पथके गठीत करून तपास सुरू केला. फरार आरोपी राजू मडावी याच्या कुटुंबीयाकडे त्याच्यासंदर्भात विचारणा केली होती. त्यानंतर राजू मडावी हा स्वत: शरण जाण्यासाठी उत्पादन शूल्क विभागाच्या कार्यालयात गेला. दरम्यान मडावी याने त्या कार्यालयातील बाथरूममध्ये उंदीर मारण्याचे औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

फरार आरोपीने चक्क कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. राजू मडावी हा दारू पिऊन आला होता, त्याने पोलिसांसोबत वादही घातला, या प्रकरणातून आपली सुटका करण्याच्या अनुषंगाने त्यांनी नाट्य घडविले, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर