गतिरोधकाच्या उंचीमुळे अपघात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:14 IST2021-01-13T05:14:14+5:302021-01-13T05:14:14+5:30
माजरीतील समस्या सोडविण्याची मागणी भद्रावती : तालुक्यातील मोठे गाव असलेल्या माजरीमध्ये विविध समस्या आहे. निर्माण झाल्या असून, या समस्यांचे ...

गतिरोधकाच्या उंचीमुळे अपघात वाढले
माजरीतील समस्या सोडविण्याची मागणी
भद्रावती : तालुक्यातील मोठे गाव असलेल्या माजरीमध्ये विविध समस्या आहे. निर्माण झाल्या असून, या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. या समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, अशी मागणी आहे.
रस्ते हागणदारीमुक्त करण्याची मागणी
घुग्घुस : मुख्य मार्गावरुन तलावमार्गे ग्रामपंचायत तथा बाजारकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर त्या परिसरातील नागरिक शौचालयासाठी करीत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घुग्घुसला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे शहरातील रस्ते हागणदारीमुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अवैध चराई बंद करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील जुनोना जंगल परिसरात पाळीव गुरांना चराईसाठी सोडण्यात येते. त्यामुळे वनाचे नुकसान होत आहे. जुनोना चौकाजवळच काही जणांकडे मोठ्या संख्येने पशुधन आहे. त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.