शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या डोळ्यादेखत सहाय्यक अन्न पुरवठा निरीक्षक मुलाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 14:38 IST

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील कुणाल हा वर्धा येथे सहायक अन्नपुरवठा निरीक्षक पदावर कार्यरत होता. होळीनिमित्त तो विसापूरला सुट्टीवर आला होता.

ठळक मुद्देविसापुरात शोककळा

बल्लारपूर (चंद्रपूर) : मुलाला बल्लारपूर रेल्वे स्थानकावर दुचाकीने साेडून देताना ट्रकची धडक बसली. वडील रस्त्याच्या कडेला पडले तर मुलगा ट्रकखाली आला. त्यात घटनास्थळीच मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात बल्लारपूर येथील काटा गेटसमाेर सोमवारी सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास झाला.

कुणाल गजानन डबरे (३४) असे मृताचे नाव आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील कुणाल हा वर्धा येथे सहायक अन्नपुरवठा निरीक्षक पदावर कार्यरत होता. होळीनिमित्त तो विसापूरला सुट्टीवर आला होता. कुटुंबीयांसोबत होळी साजरी केल्यानंतर सोमवारी सकाळी तो वर्धा येथे परत जाणार असल्याने वडील गजानन डबरे व कुणाल हे बापलेक स्कुटीने (एमएच-३४/टी-१४२० ) बल्लारपूर रेल्वे स्टेशनकडे जात होते. दरम्यान, बल्लारपूर येथे मागाहून भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच-३४/व्ही-०९९४) स्कुटीला जबर धडक दिली. यात कुणालचे वडील हे रस्त्याच्या बाजूला पडले, तर कुणाल ट्रकच्या चाकाखाली आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, चालक ट्रक जागीच सोडून पसार झाला. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 

कुणालला चिमुकल्या जुळ्या मुली

कुणालचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला एक वर्ष वयाच्या जुळ्या मुली आहेत. कुणालची पत्नी सातारा जिल्ह्यात सहायक अन्नपुरवठा निरीक्षक पदावर कार्यरत आहे. दोघांची दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत नोकरी असल्याने ते फोनवरच बोलत होते. दोन महिन्यांपूर्वी कुणाल पत्नी व मुलींना भेटण्यासाठी साताऱ्याला होता. आता ही भेट कधीही शक्य नाही. या घटनेने विसापुरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूballarpur-acबल्लारपूर