शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Accident: ट्रकने कारला फरफटत नेले, वैद्यकीय दाम्पत्याचा मृत्यू, वरोरा-वणी मार्गावर भीषण अपघात

By राजेश भोजेकर | Updated: March 22, 2023 20:31 IST

Accident:  वरोरा-वणी मार्गावरील शेंबळ गावाच्या शिवारात भरधाव हायवा ट्रकने कारला समोरून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये हायवाने कारला अर्धा किमी अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात कारमधील वैद्यकीय अधिकारी असलेले दाम्पत्य ठार झाले.

चंद्रपूर - वरोरा-वणी मार्गावरील शेंबळ गावाच्या शिवारात भरधाव हायवा ट्रकने कारला समोरून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये हायवाने कारला अर्धा किमी अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात कारमधील वैद्यकीय अधिकारी असलेले दाम्पत्य ठार झाले. हा अपघात बुधवार, दि. २२ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला. अतुल गौरकार (वय ३४) व त्यांच्या पत्नी अश्विनी गौरकार (३१, रा. दीनदयाल सोसायटी, तुकुम, चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत. अतुल गौरकार हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपजिल्हा रुग्णालय, तर अश्विनी या यवतमाळ जिल्ह्यातील वणी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

वरोरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हायवा ट्रक ताब्यात घेऊन चालक अभिमन्यू साकेत (२५, मूळचा मध्य प्रदेश, हल्ली मुक्काम शेंबळ) याला अटक करण्यात आली आहे. नागरिकांकडून याबाबत हळहळ व्यक्त होत होती. प्राप्त माहितीनुसार, अतुल गौरकार व त्यांच्या पत्नी अश्विनी हे दोघेही चंद्रपूरहून कार (एमएच ३४ एएम ४२४०)ने वरोरा नजीकच्या बायपास मार्गाने वणीकडे जात होत होते. वरोरा तालुक्यातील शेंबळ शेतशिवारात समोरून भरधाव वेगात आलेल्या हायवा ट्रक (एमएच ३४ बीझेड २९९६)ने कारला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात हायवा ट्रकने कारला अर्धा किमीपर्यंत फरफटत नेले. या अपघातात कारमध्ये असलेले गौरकार दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाले. कारमध्ये दोघेही अडकून पडले होते. घटनास्थळी धावून आलेल्या लोकांनी त्यांना मोठ्या कसरतीने बाहेर काढले. मात्र, अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी असलेले अतुल गौरकार यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूरला हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र, वाटेतच भद्रावतीजवळ त्यांचीही प्राणज्योत मालवली. अतुल आणि अश्विनी यांना एक वर्षाचा शेरवीर हा मुलगा आहे. आई-वडिलांवर अचानक काळाने घाला घातल्याने हा चिमुकला पोरका झाला आहे. या घटनेचा पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.

अश्विनी या वैद्यकीय अधिकारीअश्विनी गौरकार या वणी येथील उपजिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांनी एकच दिवस सेवा दिल्याची माहिती त्यांच्या आप्तेष्टांनी दिली.

दैव बलवत्तर म्हणून शेरवीर बचावलाअपघातात ठार झालेल्या गौरकार दाम्पत्याला एक वर्षाचा शेरवीर नावाचा मुलगा आहे. तिघेही चंद्रपूरला आले होते. अतुल आणि अश्विनी यांनी चंद्रपूरला आपल्या घरी आजोबाकडे चिमुकल्याला ठेवून वणीला जाऊन येतो म्हणून गेले होते, अशी चर्चा सुरू आहे. काळ दबा धरून बसला होता. या अपघातात दोघेही ठार झाले. सुदैवाने चिमुकला शेरवीर यातून बचावला. दैव बलवत्तर म्हणून शेरवीर बचावल्याची चर्चाही समाजमाध्यमांवर आहे.

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र