नेरी-सिरपूर-नवरगाव टी पार्इंटवर अपघात
By Admin | Updated: July 2, 2015 01:27 IST2015-07-02T01:27:56+5:302015-07-02T01:27:56+5:30
चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नेरीजवळील लावारी येथील विद्यार्थी राकेश ज्ञानीवंत गुरनुले (१७) हा सकाळी

नेरी-सिरपूर-नवरगाव टी पार्इंटवर अपघात
प्रकृती गंभीर : उपचाराकरिता नागपूरला रवाना
चिमूर : चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नेरीजवळील लावारी येथील विद्यार्थी राकेश ज्ञानीवंत गुरनुले (१७) हा सकाळी वाजता सुटल्यानंतर गावाकडे परतीच्या मार्गावर असताना नेरी- सिरपूर- नवरगाव टी पार्इंटवर असलेल्या रवी सायकल स्टोअर्स येथे नवरगाव मार्गे भरधाव वेगाने येणाऱ्या टॅक्सने (एम.एच.३१- ७२०६) उडविले. सदर विद्यार्थी हा जनता कनिष्ठ महाविद्यालय नेरी येथे वर्ग ११ वीमध्ये शिक्षण घेत असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजता राकेश गुरुनुले हा विद्यार्थी नेरी येथील नेरी- सिरपूर- नवरगाव टी पार्इंटवर असलेल्या सायकल स्टोअर्समध्ये त्याच्याकडे असलेल्या सायकलमध्ये हवा कमी असल्याने हवा मारीत होता. तळोधी- चिमूर बस एम.एच.२५ डी.८५५० व टॅक्स एम.एच.३१- ७२०६ यांचे क्रांसिग झाले. मात्र ओव्हरटेक करताना ट्रक्सने विद्यार्थ्यांला धडक दिली. त्याला प्राथमिक उपचाराकरिता नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्याला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चिमूरला नेण्याचा सल्ला दिला. मात्र चिमूरला आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता नागपूरला रवाना करण्यात आले. सदर टॅक्सचा मालक व चालक साटोणे यांनी यापूर्वीही तीन ते चार अपघात केले आहे. सदर अपघात झाल्यानंतर घटनास्थळी राकेश गुरनुले शिकत असलेल्या जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी दाखल झाले. मात्र तात्काळ कोणीही सदर विद्यार्थ्यांला आर्थिक मदत केली नाही. वृत्त लिहिपर्यंत टॅक्स चालक फरार आहे. (तालुका प्रतिनिधी)