दारू तस्करी करणाऱ्या वाहनाला अपघात

By Admin | Updated: April 20, 2016 01:19 IST2016-04-20T01:19:28+5:302016-04-20T01:19:28+5:30

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दारूची वाहतूक करणारे वाहन चांगलेच क्षतीग्रस्त झाले.

Accident of the liquor smugglers | दारू तस्करी करणाऱ्या वाहनाला अपघात

दारू तस्करी करणाऱ्या वाहनाला अपघात


नागभीड: दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दारूची वाहतूक करणारे वाहन चांगलेच क्षतीग्रस्त झाले. या वाहनात ३० ते ३५ पेट्या दारू असली तरी येणाऱ्या जाणाऱ्यांनी या दारूवर चांगलेच हात साफ केल्याची माहिती आहे. ही घटना मंगळवारी घोडाझरी फाट्याजवळ घडली.
एमएच ३४ एए- ३८३३ हे वाहन दारू घेवून नागभीड तळोधीकडे जात होते. घोडाझरी फाट्याजवळ या वाहनाला कुण्यातरी अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली असावी. या धडकेत या वाहनाचे मागील भाग पूर्णत: चेंदामेंदा झाला. या वाहनात देशी दारू आहे. असे समजल्यावर अनेकांनी या दारूवर हात साफ केला. दरम्यान, पोलिसांना ही माहिती समजताच पोलीस घटनास्थळावर पोहचले. उर्वरित दारूच्या पेट्या पोत्यात भरुन त्या जप्त करण्यात आल्या. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Accident of the liquor smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.