शेती अवजारे दुरुस्ती करण्यास आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST2021-06-09T04:35:29+5:302021-06-09T04:35:29+5:30
मासळ परिसरात धान, कापूस, सोयाबीन आणि तूर पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. खरिपाच्या हंगामात या पिकांच्या पेरणीसाठी आणि शेतीच्या ...

शेती अवजारे दुरुस्ती करण्यास आला वेग
मासळ परिसरात धान, कापूस, सोयाबीन आणि तूर पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. खरिपाच्या हंगामात या पिकांच्या पेरणीसाठी आणि शेतीच्या अंतर्गत मशागतीसाठी लाकडी अवजारे वापरली जाते. यासाठी शेतकरी वखर, फण, नांगर, तिफण आणि बैलांच्या खांद्यावरील जू इत्यादी अवजारे लागतात. यासाठी शेतकरी वर्ग कारागिरांच्या दुकानात गर्दी करत आहेत. कोरोना आजाराच्या संसर्गामुळे हा व्यवसाय मागील काही दिवसांपासून बंद होता. मात्र, खरिपाचा हंगाम सुरू झाल्याने, पेरणी, लागवड करण्यासाठी शेती अवजारे दुरुस्ती करण्यात येत असल्याने, सध्या तरी आठवड्यापासून काम मिळत आहे. यातून कारागिरांना थोडासा दिलासा मिळत असल्याने, लाकडी शेती अवजारे दुरुस्ती करणारे कारागीर समाधान व्यक्त करीत आहे. मासळ परिसरात अनेकजण आजोबा पासून चालत आलेला शेती अवजारे बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत आहेत.