चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:42 PM2019-03-19T22:42:39+5:302019-03-19T22:43:17+5:30

तालुक्यात यावर्षी अल्प पाऊस पडला. याचा मोठा फटका जनतेसह मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे. चारा आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पहाडावर असणाऱ्या गावांतील शेकडो जनावरे वनवन भटंकती करत आहेत.

The absence of fodder animals | चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : जनावरांसाठी चारा छावण्यांची गरज

संघरक्षित तावाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : तालुक्यात यावर्षी अल्प पाऊस पडला. याचा मोठा फटका जनतेसह मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे. चारा आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पहाडावर असणाऱ्या गावांतील शेकडो जनावरे वनवन भटंकती करत आहेत.
सध्या तालुक्यात मुक्या जनावरांसाठी चारा व पाण्याची आवश्यकता आहे. गाय, बैल, म्हैस, शेळ्या, बकऱ्यांना चारा मिळत नसल्याने भटकावे लागत आहे. चरायला जंगल किंवा गावाबाहेर गेल्यानंतर पाणी मिळत नाही, एवढी भयावह स्थिती मुक्या जनावरांवर आली आहे. पहाडावर जंगलाचे प्रमाण आधीच कमी आहे. त्यातच यंदा दुष्काळ पडला. उन्हामुळे झाडेझुडपे वाळली. दिवसभर जंगलात फिरून जनावरे उपाशीपोटी घरी परत येत आहेत. त्यामुळे शेतकरी हबलत झाले. माणूस कुठेही जाऊन पोट भरू शकतो पण जनावरांचे काय, हा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. प्रशासनाने या परिसराची पाहणी करून वास्तस्थिती जाणून घ्यावी आणि तातडीने चारा छावण्या उभारण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
बेभाव विक्री
जिवती तालुका हा पहाडावर आहे. नेहमीच दुष्काळाच्या झळा बसतात. यावर्षी पिके वाया गेली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. उन्हाळ्याला आता सुरुवात झाली. जनावरांची उपासमारी टाळण्यासाठी बेभाव किमतीत विकण्याची तयारी शेतकरी करत असल्याचे दिसून येत आहे.
भूकबळीचा धोका
चारा आणि पाण्याचा प्रश्न असाच राहिला तर जनांवराचा भूकबळी जाऊ शकतो, अशी परिस्थिती पहाडावर निर्माण झाली आहे. आपल्या मुलांची उपासमारी होऊ नये, यासाठी आई-वडिल चिंतेत असतात. अन्नाची जुळवाजुळव करतात. मुकी जनावरेही आमची लेकरे आहेत. पण पाणी व चारा मिळत नसल्याने जनावरांना जगवायचे कसे, या प्रश्नाने शेतकरी हैराण झाले आहेत.

Web Title: The absence of fodder animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.