विविध समस्यांबाबत शिवसेनेचा वरोरा नगरपरिषदेवर मोर्चा
By Admin | Updated: April 14, 2017 00:48 IST2017-04-14T00:48:55+5:302017-04-14T00:48:55+5:30
नवीन नगराध्यक्ष पदभार स्वीकारून चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. विकासाची गंगा शहरात आणणार अशा अनेक मुद्यांवर सत्ताधारी निवडून आले.

विविध समस्यांबाबत शिवसेनेचा वरोरा नगरपरिषदेवर मोर्चा
नगराध्यक्षांना निवेदन : शहरातील पाणी, वीज, नाली सफाईची समस्या
वरोरा : नवीन नगराध्यक्ष पदभार स्वीकारून चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. विकासाची गंगा शहरात आणणार अशा अनेक मुद्यांवर सत्ताधारी निवडून आले. मात्र शहरात समस्यांचा डोंगर असल्याने गुरूवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगरपरिषदेवर शेकडो महिला व पुरूषांना घेऊन मोर्चा काढला.
मोर्चेकरी नगराध्यक्ष एहेतेशाम अली यांच्या कक्षावर धडकले. यावर नगराध्यक्षांनी तीन-चार दिवसात तोडगा काढू आश्वासन दिले. जर समस्या निकाली काढल्या नाही तर पुन्हा महिलांना घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा नगरसेवक पंकज नाशीककर, राखी गिरडकर, सन्नी गुप्ता, गजानान मेश्राम , शुभम चिमुरकर, दिनेश यादव, मनीष काळबांडे यांनी दिला आहे. नगराध्यक्ष ऐहतेशाम अली यांनी सर्वाच्या समस्या ऐकुन घेत त्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावून सर्व समस्या निकाली काढण्याचे लेखी आदेश दिले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)