अभाअंनिसतपे "बाबा ते बाबा" अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST2020-12-22T04:27:48+5:302020-12-22T04:27:48+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनापर्यंत गोंदिया-गडचिरोली ते रत्नागिरीपर्यंत व्हर्च्युअल पद्धतीने सादर केले. ज्येष्ठ ...

अभाअंनिसतपे "बाबा ते बाबा" अभियान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनापर्यंत गोंदिया-गडचिरोली ते रत्नागिरीपर्यंत व्हर्च्युअल पद्धतीने सादर केले. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या मार्गदर्शनाने गडचिरोलीपासून अभियानाची सुरवात झाली. अ. भा. नि. समितीची ३८ वर्षांची वाटचाल लोकांसमोर मांडणे. समाजसुधारक व संत यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार जनतेला सांगणे. निरोगी जीवन जगण्यासाठी विवेकवादी विचारांची आवश्यकता समजावून सांगणे, हा अभियानाचा होता. राज्य स्तरावर अभियानाचे उद्घाटन ६ डिसेंबर व्हर्चुअल पद्धतीने झाले. समारोप कार्यक्रम २२ डिसेंबरला सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या उपस्थितीत प्रा. श्याम मानव यांच्या संत गाडगेबाबा व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. फेसबुक,युट्युबवर लाईव्ह असणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अभाअंनिसचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे.