चंद्रपुरात साकारणार अब्दुल कलाम वन उद्यान

By Admin | Updated: August 6, 2015 02:00 IST2015-08-06T02:00:10+5:302015-08-06T02:00:10+5:30

राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला बल्लारपूर रोड येथे

Abdul Kalam Forest Park will be set up at Chandrapur | चंद्रपुरात साकारणार अब्दुल कलाम वन उद्यान

चंद्रपुरात साकारणार अब्दुल कलाम वन उद्यान

चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला बल्लारपूर रोड येथे महाराष्ट्र वन विकास महामंडळ व वन विभागाच्या प्रयत्नातून देशाचे माजी राष्ट्रपती ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वन उद्यान’ साकारण्यात येणार आहे. हा निर्णय वन विभागाच्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला महाराष्ट्र वन विकास महामंडाळाचे महाव्यवस्थापक एस. एस. डोळे, मुख्य वन संरक्षक संजय ठाकरे, विभागीय व्यवस्थापक एस. बी. पाटील, सहायक व्यवस्थापक व्ही. एस. शेलार, सहायक वन संरक्षक ए.के. बडकेलवार, सहायक वन संरक्षक व्ही.डब्ल्यू. मोरे, सहायक वनसंरक्षक कविटकर, सुहास अलमस्त, शैलेश बैस, सुभाष कासनगोट्टूवार व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला बल्लारपूर रोड येथे महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या २० हेक्टर जागेवर माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने वन उद्यान साकारणार आहे. या उद्यानात नेचर ट्रेल, पॅगोडा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम संग्रहालय, प्राण्यांचे पूतळे, माहितीचे फलक, बालोद्यान, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, वन सफारीची व्यवस्था, कॅक्टस गार्डन, वॉटर फॉल, लक्ष्मण झुला, बांबू वन, आकर्षक प्रवेशद्वार ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा वॉकिंग ट्रॅक, फाऊंटन व सोलर दिवे आदी सुविधा असणार आहेत. उद्यानासाठी वन विभाग व डब्ल्यूसीएलचा सीएसआर निधी प्राप्त होणार आहे. या उद्यानाचे उद्घाटन १५ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लहान मुलांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे उद्यान असावे, असा आग्रह पालकमंत्री यांचा आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम संग्रहालय या उद्यानाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Abdul Kalam Forest Park will be set up at Chandrapur