ह्युएन-त्संंगचा ध्येयासाठीचा त्याग अनुकरणीय
By Admin | Updated: September 29, 2014 00:43 IST2014-09-29T00:43:14+5:302014-09-29T00:43:14+5:30
ध्येयासाठी सुखाचा त्याग करणाऱ्या ह्युएन- त्संगकडून संघीय प्रेरणा अनुकरणीय असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. येथील प्रियदर्शिनी सभागृहात शिव महोत्सव

ह्युएन-त्संंगचा ध्येयासाठीचा त्याग अनुकरणीय
ंआ.ह. साळुंखे यांचे मनोगत : शिव महोत्सव समितीची व्याख्यानमाला
चंद्रपूर : ध्येयासाठी सुखाचा त्याग करणाऱ्या ह्युएन- त्संगकडून संघीय प्रेरणा अनुकरणीय असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. येथील प्रियदर्शिनी सभागृहात शिव महोत्सव समितीच्यावतीने शनिवारी आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
ते म्हणाले, सहाव्या शतकातील चीन भूमीमध्ये जन्मलेल्या ह्युएन-त्संग यांच्यावर भारतातून चिनमध्ये गेलेल्या बौद्ध भिक्कूंच्या प्रभावाने प्रेरीत होऊन त्संग यांनी बुद्ध भूमीला भेट देण्याचा निर्धार केला. त्याकाळी देश ओलांडणे हे फार धोकादायक व त्रासाचे होते. यापेक्षाही राजाची परवानगी मिळणे अशक्य होते. या सर्व अडचणींवर मात करायची आणि बुद्धभूमी पाहायची, अभ्यासाची, तेथील प्रेरणा घ्यायची, या ध्येयाने पछाडलेल्या त्संग यांनी आशिया खंडातील सर्वांत मोठे वाळवंट ‘कोबी’ हे घोड्याच्या साह्याने पार केले. या प्रवासात त्यांना चार दिवस व पाच रात्री पाण्याविना रहावे लागले.
भारतात परत आल्यानंतर त्यांनी एक वर्ष नालंदा विद्यापीठात घालविले. आयुष्यातील बराचसा कालावधी भारतात घालविल्यानंतर त्यांनी भारतातून ६००च्यावर ग्रंथ चीनमध्ये नेले आणि त्याचे चिनी भाषेत भाषांतर केले. त्यासाठी तेथे संघीय पद्धतीने काम केले. ते आपल्यासाठी अनुकरणीय असल्याचे डॉ. आ.ह. साळुंखे यांनी म्हणाले.
हे दुसरे पुष्प स्मृतिशेष हेमंतराव माधवराव खळतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्राचार्य डॉ. सुलभा हेमंतराव खळतकर यांच्यातर्फे आयोजित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक ना.गो. थुटे तर प्रमुख अतिथी म्हणून बळीराज धोटे, प्रदीप अडकिने, हरीश सहारे, प्रा. सुलभा गावंडे, प्रदीप जानवे, श्याम जेठवाणी आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन रजनी जेऊरकर यांनी तर प्रा. डॉ. योगेश्वर दुधपचारे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. चेतन खुटेमाटे, विनोद थेरे, विवेक बलकी, प्रा. दिलीप चौधरी, डॉ. सचिन भेदे, इंजि. जीवन नारनवरे, प्रा. इरफान शेख, दिनकर श्रीरामे, अॅड. संदीप नागपुरे, डॉ. विनोद माहुरकर, डॉ. संजय घाटे आदींनी अथक परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)