केंद्रीय राज्यमंत्र्यांना आम आदमी पार्टीचे निवेदन
By Admin | Updated: January 5, 2016 01:26 IST2016-01-05T01:26:35+5:302016-01-05T01:26:35+5:30
चंद्रपूर ते नागपूर शटल ट्रेनच्या दिवसातून किमान तीन फेऱ्या ताबडतोब सुरू कराव्या, यासह रेल्वेबाबतच्या विविध समस्या

केंद्रीय राज्यमंत्र्यांना आम आदमी पार्टीचे निवेदन
चंद्रपूर : चंद्रपूर ते नागपूर शटल ट्रेनच्या दिवसातून किमान तीन फेऱ्या ताबडतोब सुरू कराव्या, यासह रेल्वेबाबतच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांना निवेदन देण्यात आले.
या फेऱ्या सुरू झाल्यास जनतेच्या पैशाची व वेळेची मोठी बचत होईल. चंद्रपूर जिल्ह्यात बंगाली बांधवांची संख्या मोठी आहे. त्यांच्या सोयीकरिता सिकंदराबाद ते हावडा व्हाया चंद्रपूर ट्रेन सुरू करण्यात यावी. चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्र. २ वर प्रतीक्षालय बांधण्यात यावे. मालधक्काजवळील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ धूळ, खड्डे व चिखलाचा त्रास होतो. या ठिकाणी सिमेंटकाम करण्यात यावे. सिकंदराबाद ते पुणे व्हाया चंद्रपूर रेल्वे सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिष्टमंडळात सुनील मुसळे, भीवराज सोनी, सुनील भोयर, सूर्यकांत चांदेकर, आकाश गड्डमवार, वामन नंदुरकर, शंकर धुमाळे, दिलीप तेलंग, पंकज बकाले, वंदना गवळी, आयुबभाई शाकीरभाई, अजय डुकरे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)