शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा अखेर सावली पोलिसांच्या जाळ्यात

By परिमल डोहणे | Updated: August 26, 2023 14:53 IST

कॅरिअर्स कंपनीचा कंटेनर जप्त

चंद्रपूर : दुचाकीला धडक देऊन जखमीला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून कंटेनर घेऊन मागील आठ महिन्यांपासून फरार असलेल्या चालकाला अखेर सावली पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अत्यंत शिताफीने अटक केली. मड्डी श्रीनिवास गौड हनुमंथु गौड (५६) असे अटकेतील आरोपीचे नाव असून साईराम कॅरिअर्स कंपनीचा कंटेनर एपी २९ टीए ९६६३ क्रमांकाचा ट्रक जप्त केला आहे.

८ जानेवारी २०२३ रोजी खेडी फाट्याजवळ एमएच ३३ ई ३२९१ क्रमाकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यामध्ये प्रफुल्ल सुरेश मडावी यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनास्थळावर कोणतेच पुरावेही आढळून आले नव्हते. दरम्यान सावली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. तसेच जीपीएस लोकेशनचे ॲक्सेस घेतले. तेव्हा एक कंटनेर बाबत पोलिसांना माहिती मिळाली. तेव्हापासून सावली पोलिस त्या कंटेनरच्या माघावर होते. मात्र तो कंटेनर या परिसरात येतच नसल्याचे दिसून येत होते. 

दरम्यान गुरुवारी रात्री तो कंटेनर महाराष्ट्रात येत असल्याची माहिती सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. त्यांनी लगेच आपली चमू लक्कडकोट बॉर्डरवर पाठवली. यावेळी ती चमू त्या कंटेनरचा पाठलाग करत चंद्रपूरपर्यंत आले. दरम्यान ते कंटेनर गडचिरोलीकडे जाताच सावली पोलिसांनी खेडी जवळ नाकाबंदी केली. यावेळी कंटेनर येताच कंटेनरसह त्या चालकाला अटक करण्यात आली. ही कारवाई सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात सावली पोलिसांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर