शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाप तो बापच! तापाने फणफणलेलं लेकरू अन् उपचारासाठी 'त्याची' पुरातून पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 11:39 IST

श्यामराव पत्रूजी गिनघरे यांचा मुलगा तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही व बाहेर पूरपरिस्थिती अशा परिस्थितीत शामराव मुलाला घेऊन पुराच्या पाण्यातून उपचारासाठी रुग्णालयाकडे निघाले.

ठळक मुद्देचंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यातील घटना

राजेश माडुरवार

वढोली (चंद्रपूर) : मुलगा तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही. नदी, नाल्यांना पूर. मात्र बाप तो बापच. मुलाला खांद्यावर घेत बापाने पुरात पाय ठेवला. पुरातून पायी मार्ग काढत मुलावर उपचार करण्यासाठी दुसऱ्या गावाला घेऊन गेला. या जिगरबाज बापाचे नाव आहे, श्यामराव पत्रूजी गिनघरे. तो गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील रहिवासी आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे वर्धा, वैनगंगा नदीला पूर आला. पोडसा हे गाव वर्धा नदीच्या काठावर वसले आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे गावाला बेटाचं स्वरूप आले आहे. गावातील श्यामराव पत्रूजी गिनघरे यांचा मुलगा कार्तिक याला ताप आला. तापाने तो फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही. दुसरीकडे दुसऱ्या गावाला जाणारे मार्ग पुराने वेढलेले. मात्र बाप मुलाची वेदना बघू शकला नाही. पोडसा गावापासून पाच ते सहा कि. मी. अंतरावर वेडगाव हे गाव आहे. येथे खासगी डॉक्टर आहेत. मुलाला खांद्यावर घेऊन भर पुरातून श्यामराव मार्ग काढत गेला. मुलावर उपचार केला अन् परत पुरातून मार्ग काढीत गावाकडे आला.

चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे पूरस्थिती आहे. नदी-नाले ओसांडून वाहत असून अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने  जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेकडो घरे पुराच्या पाण्याखाली आली असून हजारावर लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अशावेळी मुलाच्या उपचारासाठी बापाला भरपूरातून जावे लागले. बापाची लेकरासाठीची ही तळमळ पाहून अवघा गाव गहिवरला. 

टॅग्स :SocialसामाजिकHealthआरोग्यRainपाऊसfloodपूरchandrapur-acचंद्रपूर