शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार ! शिक्षकाने ६ विद्यार्थिनींशी केले अश्लील वर्तन; पोक्सो अंतर्गत ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:25 IST

Chandrapur : समाजाला दिशा देण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या एका वर्गशिक्षकाने आठव्या वर्गातील सहा विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करून गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाजाला दिशा देण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या एका वर्गशिक्षकाने आठव्या वर्गातील सहा विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करून गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला.

चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित शाळेत शुक्रवारी (दि.२० फेब्रुवारी) हा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी गोवर्धन गोंडाणे (५१) या नराधम शिक्षकाला पोक्सो अंतर्गत बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शाळेतील शिक्षक वर्गातील विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत असल्याची कुणकुण शहर पोलिसांना लागली होती. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने शाहनिशा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने साध्या वेशात शाळेत जाऊन चौकशी केली.

प्राथमिक तपासात तथ्य आढळताच महिला व बालविकास विभाग आणि चाइल्डलाइनच्या मदतीने विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी एकापाठोपाठ एक अशा सहा मुलींनी या नराधम शिक्षकाच्या कृत्यांचा पाढाच वाचला. त्यावरून त्याला अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ प्रमोद चौगुले, ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात पीएसआय पल्लवी काकडे, पीएसआय तृप्ती खंडाईत आदींनी केली.

शाबासकीच्या बहाण्याने 'बॅड टच' आरोपी गोवर्धन गोंडाणे हा मागील अनेक वर्षांपासून याच शाळेत कार्यरत होता. मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार, तो वर्गात शिकवताना मुलींकडे अत्यंत घाणेरड्या नजरेने पाहायचा. शाबासकी देण्याच्या नावावर शरीराला अश्लील स्पर्श करणे, मांडीला हात लावणे आणि संगणक लॅबमध्ये एकट्या विद्यार्थिनीला बोलावून अश्लील चाळे करणे, असे कृत्य त्याचे नित्याचेच झाले होते. कधी-कधी तो मुलींना 'घरी कधी नेता?' अशी विचारणा करून अश्लीलतेची सीमा ओलांडत होता.

पीडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता

आरोपी शिक्षक गोंडाणे याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.हा शिक्षक अनेक वर्षांपासून याच शाळेत असल्याने, त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर विद्यार्थिनींची छेड काढली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस आता त्या दिशेनेही तपास करत असून, आणखी काही पीडित मुली समोर येण्याची शक्यताही वाढली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी