लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नवनियुक्त पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या चंद्रपुरातील प्रथम आगमनानिमित्त शनिवारी (दि. २५) आयोजित सत्कार सोहळा वादाच्या सावटात पार पडला. सत्कारानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप कार्यकर्ता मेळाव्यासाठी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाची मागणी केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय कार्यक्रमाला नकार दर्शवून आदिवासी संघटनेच्या पत्रावरून परवानगी दिली.
शासन आदेशानुसार, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात राजकीय पक्षांना कार्यक्रम घेण्यास मनाई आहे. परंतु, किशोर जोरगेवार यांनी भाजप कार्यकर्ता मेळावा व पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या सत्कार कार्यक्रमासाठी या सभागृहाची मागणी केली होती.
पालकमंत्र्यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते रविवारी (दि. २६) सकाळी ९:१५ वाजता पोलिस मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा होणार आहे. सर्वांनी राष्ट्रीय पोशाख परिधान करून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले.
परवानगी मिळाली; मात्र गटातटात नसलेले कार्यकर्ते संभ्रमात राज्याचे आदिवासी विकासमंत्री व पालकमंत्री डॉ. अशोक उईके रविवारी (दि. २६) प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभासाठी शनिवारी सायंकाळी चंद्रपुरात दाखल होत आहेत. या सत्कार सोहळ्याचे फलक शहरात सर्वत्र झळकले. आदिवासी संघटनेच्या पत्रावरून सत्कार सोहळ्याला सभागृह मिळाले. राजकीय कार्यक्रम होणार नाही. मात्र, कार्यक्रमासाठी आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूर महानगर पदाधिकारी व माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच समर्थकांना विश्वासात घेतले नाही, अशी चर्चा आहे. सत्कार सोहळ्याला जिल्हा प्रशासनाकडून प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृह मिळाले.
अखेर आदिवासी संघटनेचे पत्र ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच राजकीय कार्यक्रम घेऊ नका, असे स्पष्ट सांगत नकार दिला. त्यामुळे आदिवासी संघटनेने पत्र दिले. या पत्रावरील सांस्कृतिक सभागृहाची परवानगी मिळाली.
"राजकीय कार्यक्रमांना प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह देता येत नाही. सुरुवातीला राजकीय कार्यक्रमासाठी तसे पत्र मिळाले होते. ते नियमात बसत नसल्याने नकार दिला. आदिवासी सामाजिक संघटनेने पत्र दिल्यानंतर राजकीय कार्यक्रम होणार नाही, या अटीवर सभागृहाची परवागनी दिली."- विनय गौडा, जी. सी. जिल्हाधिकारी, चंद्रपूर.