९९८ जण कोरोना पॉझिटिव्ह टु निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:00:43+5:30

भद्रावती वेकोलि कॉलनीतील कर्मचाऱ्याला रविवारी माजरी येथील वेकोलिच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जटपुरा वार्डातील मृतक व्यक्तीचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. आजच्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर २९, मूल येथील ८, गोंडपिपरी येथील ३, भद्रावती ५, ब्रह्मपुरी दोन अशा एकूण ४७ जणांचा समावेश आहे.

998 corona positive to negative | ९९८ जण कोरोना पॉझिटिव्ह टु निगेटिव्ह

९९८ जण कोरोना पॉझिटिव्ह टु निगेटिव्ह

ठळक मुद्देभद्रावती व चंद्रपूरात प्रत्येकी एक मृत्यू : सोमवारी ४७ रूग्ण आढळले, एकूण रुग्णसंख्या १४९५ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भद्रावती वेकोलि कॉलनीतील ५३ वर्षीय कोरोनाबाधित कर्मचाऱ्याचा रविवारी तर चंद्रपूर शहरातील जपटपुरा गेट परिसरातील ६५ वर्षी व्यक्तीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या १७ झाली आहे. मृतक दोघेही न्युमोनिया आजाराने ग्रस्त होते, अशी आरोग्य प्रशासनाने दिली. सोमवारी जिल्ह्यात ४७ रूग्ण आढळले. रूग्णांची संख्या १४९५ झाली तर उपचारानंतर ९९८ जणांना सुट्टी देण्यात आली आहे.
भद्रावती वेकोलि कॉलनीतील कर्मचाऱ्याला रविवारी माजरी येथील वेकोलिच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जटपुरा वार्डातील मृतक व्यक्तीचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. आजच्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर २९, मूल येथील ८, गोंडपिपरी येथील ३, भद्रावती ५, ब्रह्मपुरी दोन अशा एकूण ४७ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात २२ हजार ७८४ व्यक्तींची अ‍ॅन्टिजेन तपासणी झाली. यापैकी ४२६ पॉझिटिव्ह तर २२ हजार ३५८ निगेटिव्ह आहेत. चंद्रपूर क्षेत्रात जटपूरा वार्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ अ‍ॅन्टिजेन तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. चाचणी करण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजता अशी ठरविण्यात आली आहे.

चंद्रपूर शहरातील रामनगर , गंजवार्ड, रामनगर सिंधी कॉलनी परिसरातील, महेश नगर तुकूम, बाबूपेठ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील, जगन्नाथ बाबा नगर, भानापेठ वार्ड, अरविंद नगर, पठाणपुरा वार्ड, मेजर गेट, नगीना बाग, शिवाजीनगर, समाधी वार्ड तर चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस या भागातील बाधित पुढे आले आहेत.
मूल शहरातील तर तालुक्यातील चिंचाळा गावातून बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील किरमिरी आणि भद्रावती येथील नेताजी नगर परिसरातील एक व्यक्तीकोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

Web Title: 998 corona positive to negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.