९९ हजार ८८२ जणांनी घेतली! तुम्ही कधी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:27 AM2021-03-28T04:27:15+5:302021-03-28T04:27:15+5:30

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. आरोग्यसेवक, कोरोना योद्धा, ४५ वर्षांवरील सहव्याधी व ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण ...

99 thousand 882 people took it! When will you take | ९९ हजार ८८२ जणांनी घेतली! तुम्ही कधी घेणार?

९९ हजार ८८२ जणांनी घेतली! तुम्ही कधी घेणार?

Next

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. आरोग्यसेवक, कोरोना योद्धा, ४५ वर्षांवरील सहव्याधी व ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात सध्या ६९ केंद्रे तयार करण्यात आली. चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील केंद्राचा अपवाद वगळता सर्व केंद्रांना कोविशिल्डचे डोस वितरित करण्यात आले. १३ मार्चला जिल्ह्याला मिळालेल्या कोव्हॅक्सिनच्या ४ हजार ८०० डोसमधून शुक्रवारपर्यंत केवळ १५२ जणांनी लस घेतली. कोविशिल्डचा पहिला डोस घेणाऱ्यांनी पुढील दोन महिन्यांत बूस्टर डोस याच लसीचा घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या.

जिल्ह्यात लसींचा तुटवडा?

लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. शिवाय, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. मात्र, सध्या सुमारे १० हजार लस उपलब्ध आहेत. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे कोविशिल्ड लसींची मागणी केली आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्याला डोस मिळाले नाहीत तर मंगळवारी काही केंद्रे बंद ठेवावी लागणार आहेत, अशी माहिती सूत्राने दिली.

चंद्रपुरात २४ हजार ९२ जणांनी घेतला डोस

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य विभागाची केंद्रे व खासगी हॉस्पिटल्स मिळून शुक्रवारपर्यंत २४ हजार ४८० जणांनी लस टोचून घेतली.

Web Title: 99 thousand 882 people took it! When will you take

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.