शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

कोरोनाकाळातही ८७ वर्षीय रामचंद्रांची रुग्ण सेवा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST

वर्धा जिल्ह्यातील विनोबा भावे यांचे आश्रम असलेल्या पवनार यागावी डॉ. रामचंद्र तानबाजी दांडेकर यांचा जन्म झाला. इयत्ता दहावीपर्यंत स्वावलंबी विद्यालय नागपूर येथे शिक्षण घेतले. १९५७-५८ मध्ये त्यांचे नागपूर येथील होमीओपॅथी महाविद्यालयात शिक्षण (डीएचपी) झाले. चंद्रपूर येथे डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार व डॉ. अंदनकर यांच्याकडून त्यांनी काही गोष्टीचे प्रशिक्षण घेतले. याच काळात चंद्रपूरचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाबट यांनी त्यांना वैद्यकीय क्षेत्रात येण्यासाठी मदत केली.

ठळक मुद्दे६० वर्षांपासून देत आहेत रूग्णांना सेवा : सायकलने पालथी घालतात गावे

भोजराज गोवर्धन।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : नागपूर येथून वैद्यकीय अभ्यासक्रमाचा डिप्लोमा घेवून मूल तालुक्यातील सुशी येथे वयाच्या २६ व्या वर्षी आलेले डॉ. रामचंद्र दांडेकर यांनी गेल्या ६० वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात सायकल प्रवास करून हजारो रूग्णांना सेवा व अनेकांना जीवनदान दिले आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग फोफावत असताना डॉ. दांडेकर यांचे कार्य मात्र थांबले नाही. ते सकाळी ६.३० वाजतापासून त्यांच्या सायकल प्रवासाला सुरूवात होते. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत परत येतात. त्यांची आरोग्यसेवा ही निरंतर आहे. सध्या त्यांचे वय ८७ आहे. मात्र अजूनही ते विना चप्पल, मोबाईल, घडी किंवा चष्म्याचा वापर करीत नाही, हे विशेष.वर्धा जिल्ह्यातील विनोबा भावे यांचे आश्रम असलेल्या पवनार यागावी डॉ. रामचंद्र तानबाजी दांडेकर यांचा जन्म झाला. इयत्ता दहावीपर्यंत स्वावलंबी विद्यालय नागपूर येथे शिक्षण घेतले. १९५७-५८ मध्ये त्यांचे नागपूर येथील होमीओपॅथी महाविद्यालयात शिक्षण (डीएचपी) झाले. चंद्रपूर येथे डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार व डॉ. अंदनकर यांच्याकडून त्यांनी काही गोष्टीचे प्रशिक्षण घेतले. याच काळात चंद्रपूरचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाबट यांनी त्यांना वैद्यकीय क्षेत्रात येण्यासाठी मदत केली. मूल तालुक्यातील सुशी येथे १९५९ रोजी महाभयंकर पूर आला होता. यावेळी संपुर्ण तालुका विस्कळीत झाला असतानाच १९६० रोजी सुशी येथील शंकर पाटील बुरांडे यांनी डॉ. रामचंद्र दांडेकर यांना सुशी येथे येण्याचा आग्रह केला. त्यांच्या विनंतीला मान देत डॉ. दांडेकर हे सुशी येथे आले. त्यावेळी डॉ. दांडेकर यांनी सुशी, दाबगांव, केळझर या परिसरात सायकलने घरोघरी फिरून आरोग्यसेवा दिली. दरम्यान १९६१ मध्ये भंगाराम तळोधी येथे सहायक शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या लिलाबाई गणपत वरघणे यांच्याशी त्यांचा विवाह झाला, विवाह झाल्यानंतर त्यांनी सुशी येथेच राहुन रूग्णसेवा दिली. ४० ते ४५ वर्षांपूर्वी नलेश्वर येथील एका वाळके नामक रूग्णाला अर्धांगवायुचा त्रास होता. अनेकांकडून औषधोपचार करून तो घरीच पडून होता. त्याला बेडसोल झाले. रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. दांडेकर यांना बोलाविले. त्यांनी तीनही पॅथीचा वापर करून केवळ दीड महिन्यात त्यांना खाटेवर बसविले, असे अनेक उदाहरण त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.या तालुक्यात दिली सेवात्या काळात आरोग्यसेवा पाहिजे त्या प्रमाणात बळकट नव्हती. यामुळे डॉ. दांडेकर यांनी मूल तालुक्याला लागून असलेल्या पोंभुर्णा, बल्लारपूर, सावली, चंद्रपूर, आणि मूल तालुक्यात सायकलने फिरून रूग्णांवर होमीओपॅथी, आयुवैदीक, आणि अ‍ॅल्युपॅथीक या तिन्ही पॅथीचा वापर करून रूग्णांना त्याकाळी बरे केले. अनेक रूग्णांचे बाळंतपणसुध्दा त्यांनी केले. रस्ता नव्हता, तरीही सायकलने त्यांनी प्रवास केला.ताप बरा झाला नाही तर कोरोना चाचणी करण्याचा देतात सल्लासध्या कोरोना संसर्ग वाढत आहे. ते स्वत: ८७ वर्षांचे आहेत. असे असतानाही ते रूग्णांची तपासणी करीत असून सर्दी, ताप, खोकला असलेल्या रूग्णांना ते मार्गदर्शन करून औषधोपचार करीत आहेत. जे रूग्ण बरे झाले नाही, त्यांना कोरोनाची आरटीपीसीआर किंवा अ‍न्टिजेन तपासणी करण्यास सांगून त्यांचाकडे विशेष लक्ष देतात.