शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

सात महिन्यांत हरवलेल्या ८६१ मुलांचे त्यांच्या पालकांसोबत घडविले पुनर्मिलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:18 IST

Chandrapur : 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'

मंगल जीवने लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत हरवलेल्या (१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२४) रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), चाइल्ड लाइन व लोहमार्ग पोलिसांच्या सहकार्याने ८६१ मुलांचे त्यांच्या पालकांसोबत पुनर्मिलन घडवून आणले. यात ५८९ मुले व २७२ मुलींचा समावेश आहे.

आरपीएफकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, ते सुटका केलेल्या मुलांसाठी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या मानकीकृत कार्यप्रणालीद्वारे अनिवार्य केलेली जबाबदारी पार पाडत आहेत आणि 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत मुलांची सुटका करण्यासाठी इतर भागधारकांसोबत काम करत आहेत. 

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर असलेल्या चाइल्ड लाइनने आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने घरून पळून आलेली भिक्षेकरी व इतर १२७ बालकांना बाल कल्याण समितीसमोर सादर केले. 

तर मध्य रेल्वेच्या इतर स्थानकांवरून एप्रिल २०२४ मध्ये ५६, जूनमध्ये ९३, जुलैमध्ये ९५, ऑगस्टमध्ये २०२, सप्टेंबरमध्ये १४१, ऑक्टोबरमध्ये १६० व नंतर ११४. यामध्ये ५८९ मुले व २७२ मुली अशा एकूण ८६१ मुलांना आरपीएफने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत त्यांच्या पालकांसोबत मनोमिलन घडवून आणले.

असे चालते कार्य गेल्या काही वर्षापासून भांडण किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर, आदींच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता घरून पळून मुले रेल्वे स्थानकावर येतात व प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात व जीआरपी पोलिसांकडे सोपवून चाइल्ड लाइनच्या मदतीने त्यांना पालकांकडे सोपवले जाते. या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात.

"आजपर्यंत आरपीएफच्या मदतीने अनेक मुलांना त्यांचे आईवडील, नातेवाईक मिळाले आहेत. यात आरपीएफचे भरपूर योगदान आहे." - भास्कर ठाकूर, समन्वयक चाइल्ड लाइन, बल्लारशाह रेल्वे स्थानक.

टॅग्स :Policeपोलिसrailwayरेल्वे