८३ हजार ३७० कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:29 IST2021-07-28T04:29:40+5:302021-07-28T04:29:40+5:30

बाधित आलेल्या सहा रूग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ३, राजुरा १, बल्लारपूर १ आणि वरोरा तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश ...

83 thousand 370 corona free | ८३ हजार ३७० कोरोनामुक्त

८३ हजार ३७० कोरोनामुक्त

बाधित आलेल्या सहा रूग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ३, राजुरा १, बल्लारपूर १ आणि वरोरा तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. चंद्रपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, चिमूर, कोरपना, जिवती तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही. एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ९८५ वर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार ३७० झाली आहे. सध्या ८१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ९ हजार ६०७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख २० हजार ३२६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५३४ बाधितांचे मृत्यू झाले आहे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

Web Title: 83 thousand 370 corona free