८ जण कोरोना बाधित तर ५ जणांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST2021-07-31T04:28:25+5:302021-07-31T04:28:25+5:30

चंद्रपूर : मागील २४ तासांत जिल्ह्यात ५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच ८ जण ...

8 people are affected by corona and 5 people are on leave | ८ जण कोरोना बाधित तर ५ जणांना सुटी

८ जण कोरोना बाधित तर ५ जणांना सुटी

चंद्रपूर : मागील २४ तासांत जिल्ह्यात ५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच ८ जण नव्याने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या ८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील १, चंद्रपूर तालुका २, बल्लारपूर १, भद्रावती १, सावली १,गोंडपिपरी १, कोरपना १,ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, पोंभूर्णा , राजुरा , चिमूर, वरोरा, जिवती या तालुक्यात एक ही रुग्ण आढळला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८५ हजार १२ वर पोहोचली आहे. तसेच सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार ४०७ झाली आहे. सध्या ७१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख १६ हजार ९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५ लाख २७ हजार ६४३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५३४ बाधितांचे मृत्यू झाले आहे.

Web Title: 8 people are affected by corona and 5 people are on leave